आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Rainbow Mountains These Rainbow Mountains Are China's Secret

रंगीबेरंबी डोंगरदऱ्या असलेला चीनचा रेनबो माउंटेन आणि स्पेक्ट्रम माउंटेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंगीबेरंबी डोंगरदऱ्या असलेल्या चीन आणि कॅनडातील दोन जगप्रसिद्ध ठिकाणांची माहिती वाचा आजच्या सदरात .


चीनचा रेनबो
माउंटेन


पावसाळ्यानंतर डोंगरदऱ्यांवर इंद्रधनुष्य दृष्टीस पडते. मात्र, संपूर्ण डोंगरच इंद्रधनुष्याच्या रंगीबेरंगी ढंगात न्हाऊन निघत असेल तर नवलच. चीनच्या डेनक्सिया लँडफॉर्म जिऑग्राफिकल पार्कमध्ये असे रहस्यमयी डोंगर आहेत. विविध रंगांच्या वाळू आणि खनिजांनी बनलेले हे डोंगर लाखो वर्षांपासून सौंदर्याची भुरळ पाडत आहेत. सोबतचे छायाचित्र पाहून कदाचित कोणाला विश्वास बसणार नाही किंवा डोंगराला रंग दिल्याचे असेही वाटेल. युनेस्कोच्या जागतिक वारशात ६ वर्षांपूर्वी या डोंगराचा आपल्या यादीत समावेश केला आहे.
कोठे - हा भाग चीनच्या उत्तरेकडील किलियन पर्वतरांगेत येतो. लिंजे आणि सुनन भागही याच सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या परिसरात पसरला आहे. चीनच्या पुरातत्त्ववाद्यांनी १९२० मध्ये हा भाग शोधून काढला. या भागात अशा प्रकारचे सौंदर्य वसले असल्याचे यापूर्वी स्थानिकांना माहीतच नव्हते.

जाण्याची सुविधा, खाण्याची नाही - सर्वप्रथम हा भाग सोंग वंश (९६०-१२७९) यांच्या राज्यात होता. डेनक्सिया राष्ट्रीय उद्यानाला लिंजे डेनक्सिया सिनिक एरिया असेही म्हटले जाते. झांगे शहरापासून २० किमी अंतरावरील लिंजे काउंडी भागात हा मोडतो. येथे येण्या-जाण्यासाठी बसची सुविधा अाहे, मात्र खानपानाची सुविधा नाही.
पुढील स्लाइडमध्ये, स्पेक्ट्रम माउंटेन