आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नामध्ये दिसले ते प्रत्यक्षात उतरवले, गरजू लाेकांसाठी उघडले रेस्तराँ; कर्मचारी येणाऱ्यांची घेतात प्रेमाने गळाभेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 टेक्सास- रुथ थाॅम्सन टेक्सासच्या मॅकिनीमध्ये रेस्तराँ चालवतात. येथील कर्मचारी आपला आनंद इतरांमध्ये वाटता यावा म्हणून ग्राहकांची गळाभेट घेतात. विशेष म्हणजे रुथने या रेस्तराँमध्ये फक्त गरजूंनाच नोकरी दिली आहे. याशिवाय ती दर महिन्याला १३० मुलांना स्वयंपाकाचे धडे देते.
 
खरे तर हे रेस्तराँ सुरू करण्याची कहाणी वेगळीच आहे. एके दिवशी रुथला रात्री स्वप्न पडले. स्वप्नात ती एक नॉन प्राॅफिट रेस्तराँ चालवत असते. तेथे काम करणारे कर्मचारी गरजवंत आणि वयस्कर होते. सलग दोन रात्री हेच स्वप्न पडल्यावर तिने पतीला याबाबत सांगितले. मग दोघांनी अगदी स्वप्नात पाहिले तसेच रेस्तराँ सुरू करण्याचे ठरवले. त्यातून कोणताही नफा कमवायचा नाही, असेही ठरले. रुथ सांगते, ‘मी अशा व्यवसायात उतरेन असे कधीच वाटले नव्हते. मात्र, त्या रात्री स्पप्न पडले आणि मी निर्णय बदलला. २००४मध्ये यावर मी संशोधन सुरू केले. त्या काळात टेक्सासमध्ये गरीब आणि गरजवंत अधिक असल्याचे दिसून आले. या भागात मी सज्ञान मुलांचा शोध सुरू केला. या मुलांना कामाची गरज होती. अशी २२ मुले मला सापडली. ते पण रेस्तराँमध्ये काम करण्यास तयार झाले. ते सर्व आज खऱ्या अर्थाने यशाच्या पायऱ्या चढत आहेत. ’ 
 
रुथ एवढ्यावरच थांबली नाही. तिने २००६ मध्ये गरजू मुला-मुलींसाठी कुकिंगचे क्लास सुरू केले. सुरुवातीला फक्त सहा मुले आली. आता ही संख्या १३० झाली आहे. माईक सेसम या रेस्तराँमध्ये कॅशियर म्हणून काम करतात. १९९०मध्ये एका अपघातात त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या शरीराचा निम्मा भाग बधिर झाला होता. त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही, परंतु डाव्या हाताने लिहिता येते. त्यांचे अक्षर अत्यंत सुंदर आहे. शिवाय गणितही पक्के आहे. माईक म्हणतात, ‘रुथची भेट झाली त्या दिवसापासून मी रोज देवाचे आभार मानतो. कारण, त्या अपघातानंतर मला नैराश्यच आले होते. कुणीतरी मदतीला येईल, असे नेहमी वाटे. प्रत्यक्षात कुणीच मदत करत नव्हते. रुथची भेट झाली आणि माझे जीवनच पालटून गेले. या रेस्तराँमध्ये काम करताना मनस्वी आनंद आणि समाधान मिळते. येथे येणारे लोक माझी गळाभेट घेतात, सदिच्छाही व्यक्त करतात. आणखी मला काय हवे...’
बातम्या आणखी आहेत...