आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडात नद्यांना पूर, हजारो घरांना फटका; लष्कराद्वारे पीडितांना मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आेट्टावा- कॅनडाला पुराचा तडाखा बसला असून शेकडो घरांना पाण्याने वेढले आहे. त्यामुळे हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. लष्कराद्वारे पीडितांना मदत पुरवली जात असून त्यांना तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कॅनडातील क्युबेक व माँट्रियलमधील अनेक नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. त्याचबरोबर तलावही तुडुंब झाले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. पावसामुळे रस्त्यावरही पाणी वाहू लागले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. परंतु तुलनेने आता परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आहे. काही दिवसांपूर्वी नागरी जीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. आता चित्र पालटू लागले आहे, असे नागरी सुरक्षा मंत्री मार्टिन कॉटिक्स यांनी स्पष्ट केले.  

अडीच हजार घरे पाण्यात
क्युबेकमधील अडीच हजारावर, तर आँटारिआेमधील ३०० घरांत पाणी शिरले आहे. या परिसरातील दीड हजारावर लोकांना घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे.   बहुतांश भागात पाऊस कमी झाला असला तरी पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी बोटीने वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागात छोट्या बोटी दिसल्या. 
बातम्या आणखी आहेत...