आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senator Rand Paul Opposing The Sale Of F 16s To Pakistan

पाकला F-16 फायटर जेट विकण्‍यास अमेरिकन सिनेटरचा विरोध, संबंध बिघडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पाकिस्‍तानला F-16 फायटर जेट विकण्‍याचा निर्णय ओबामा सरकारला महागात पडू शकतो. एका रिपब्लिकन खासदाराने सिनेटमध्‍ये संयुक्‍त ठराव सादर केला. त्‍यामध्‍ये पाकिस्‍तान विश्‍वास ठेवण्‍यासारखा देश नाही असे म्‍हणत त्‍यांना फायटर जेट्स विकण्‍यावर बंदी घालायला हवी असा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. पाकिस्तान- अमेरिकेचे संबंध बिघडले..
- सिनेट सदस्य रँड पॉल काही दिवसांपूर्वी आपल्‍या पक्षाकडून अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्‍या शर्यतीत होते.
- पॉल यांनी पाकला F-16 ची विक्री करू नये, अशी मागणी करणारा संयुक्‍त ठराव सादर केला.
- हाऊस प्रतिनिधींच्‍या परराष्‍ट्र संबंधविषयक समितीने ओबामा सरकारच्‍या या निर्णयावर प्रश्‍न उपस्‍थित केला आहे.
- या समितीला आला पॉल यांचे समर्थनही मिळाले आहे.
सिनेट सदस्य पॉल काय म्‍हणाले?
- “पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध नेहमी वादग्रस्‍त राहिले आहेत. तरी, पाकिस्तान सरकार अमेरिकेला दहशतवाद विरोधातील लढाईत मित्र मानते. मात्र, पाकिस्तानचे वर्तन काहीतरी वेगळेच सुचवते."
- “आपण त्‍यांना कोट्यवधी डॉलर्सची मदत केली. मात्र, पाक आर्मी आणि गुप्‍तचर नेहमी तालिबान व दहशतवाद्यांची मदत करत आहे.
- “पाकिस्तान दुहेरी वृत्तीचे आहे. अमेरिकेचे इतर खासदारही पाकच्‍या भूमिकेवर प्रश्‍न उपस्‍थित करतात.”
अडचणीत आहे ओबामा सरकार
- पॉल यांच्‍या आधी चेंबर ऑफ काँग्रेस आणि परराष्ट्र व्यवहार समितीनेही ओबामा प्रशासनाच्‍या निर्णयावर प्रश्‍न उपस्‍थित केला होता.
- परराष्‍ट्र व्‍यवहार समितीने ही डील थांबवण्‍याची मागणी केली.
- या समितीचे अध्‍यक्ष बॉब क्रॉकर यांनी अमेरिकेचे विदेश मंत्री जॉन कैरी यांना एक पत्र लिहिले.
- त्‍यांनी पत्रामध्‍ये असे म्‍हटले, पाकिस्तान दुहेरी वृत्‍तीचे आहे. त्‍यांना F-16 फायटर जेट्स देऊ नये.
- क्रॉकर यांनी वॉल स्ट्रीट जनरलला दिलेल्‍या मुलाखतीत म्‍हटले, “अमेरिकेतील करदात्‍यांचा पैसा पाकला जेट फायटर्ससाठी सब्सिडी देण्‍यात का वापरला जातो. आमचे सैनिक अफगाणिस्तानमध्‍ये शांतता प्रस्‍थापित करण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहेत आणि पाकिस्तान तिकडे दहशतवाद्यांना मदत करत आहे.”
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, किती कोटींची झाली डील, भारत सरकारने घेतला होता आक्षेप..