आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेतील निवडणूक जेमतेम महिन्यावर आलेली असताना रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प नव्या वादात अडकले आहेत. ट्रम्प यांनी काही वर्षांपूर्वी आपल्याशी बळजबरीने सलगी केल्याचा आरोप पाच महिलांनी केला. या खळबळजनक आरोपांमुळे ट्रम्प यांच्या प्रचार माेहिमेला आणखीनच धक्का बसला आहे.
ट्रम्प यांनी महिलांविषयी अनुद्््गार काढल्याचा २००५ चा व्हिडिआे व्हायरल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे नवे आरोप झाले आहेत. ७० वर्षीय ट्रम्प यांची आेळख स्टार म्हणूनच होती. न्यूयॉर्क टाइम्सने दोन महिलांच्या हवाल्याने ट्रम्प यांच्या लीला उजेडात आणल्या आहेत. पाम बीच पोस्टमधील एका महिलेने आपल्यावर ट्रम्प यांनी बळजबरी केली, असा आरोप केला.
रविवारच्या डिबेटनंतर महिलांचा पुढाकार : रविवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या चर्चेनंतर या महिला पुढे येऊन त्यांनी आपल्यावरील प्रसंगाला मीडियासमोर मांडले. परंतु महिलांचे सर्व आरोप ट्रम्प यांनी फेटाळून लावले आहेत. महिलांचा कधीही विनयभंग केलेला नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. महिलांच्या या कपाेलकल्पित अशा प्रकारच्या कथा आहेत, असे ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेकडून सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...