आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू जलवाटप समझोत्यावर पाकिस्तानसोबत सहमती नाही; जल विद्युत प्रकल्पावर प्रश्न उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन-  भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जलवाटपावरील समझोता घडवून आणण्यासाठी आयोजित चर्चेची फेरी निष्फळ ठरली. चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. पण पाकिस्तानने समझोत्यावर सहमती दाखवली नाही. भारताच्या किशनगंगा, रातले जल विद्युत प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे पेच कायम राहिला आहे.
 
उभय देशांत जागतिक बँकेच्या मुख्यालयात १४ व १५ सप्टेंबर दरम्यान सिंधू जल वाटपावरील समझोत्यासाठी वाटाघाटीची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु त्यात पाकिस्तानने रातले, किशनगंगेवरील जलविद्युत प्रकल्पाबाबत साशंकता व्यक्त केली. दोन्ही देशांत त्यावर सहमती झालेली नाही. परंतु आगामी काळातही दोन्ही देशांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जागतिक बँकेकडून सांगण्यात आले. या मुद्द्यावर जागतिक बँक अतिशय काटेकोरपणे आणि पारदर्शक पद्धतीने वाटाघाटीचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे. केंद्रीय जलस्रोत सचिव अमरजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ व  त्यांचे समकक्ष अरिफ अहमद खान, उच्चायुक्त युसूफ नसीम कोकहार यांनी चर्चेच्या फेरीत सहभाग घेतला होता. १ ऑगस्ट रोजी उभय देशांत चर्चेची पहिली फेरी झाली होती.
 
१९६० मधील करार
भारत-पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू जल वाटपासंबंधीचा करार झाला होता. परंतु कराराच्या नऊ वर्षांनी जागतिक बँकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांत काही मुद्द्यांवर सहमती झाली होती. दोन्ही देशांत काही मतभेद आणि वाद आहेत. ते सोडवण्यासाठी जागतिक बँक पुढाकार घेऊन मार्ग काढते. परंतु या वेळी पाकिस्तानने तडजोडीची तयारी दर्शवली नाही.
 
भूमिका सक्रिय नाही
भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद साठच्या दशकापासून सुरू आहे. त्यात जागतिक बँकेने वेळोवेळी मध्यस्थी केली. परंतु ही मध्यस्थी हा पहिल्या करारात नमूद नाही. उभय देशांतील समस्येत बँकेची भूमिका सक्रिय नसेल. 
बातम्या आणखी आहेत...