आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Story Of Zamzam Well Located Within The Masjid Al Haram In Mecca

मुस्लिमांसाठी पवित्र असते झमझमचे पाणी, वाचा कसे आले जमिनीतून वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मक्का - सौदी अरबच्या मक्कामध्ये एक धार्मिक विहिर आहे. 4000 वर्ष जुन्या या विहिरीचे नाव झमझम असे आहे. तिला द वेल ऑफ झमझम असे म्हणतात. मुस्लीम बांधववांसाठी हे अत्यंत पवित्र स्थळ आहे. एकदा इब्राहीमचा मुलगा खूप तहानलेला असल्याने पाण्यासाठी कासावीस झाला होता, त्यावेळी अचानक जमिनीतून पाणी वर आले, असे या वहिरीबाबत सांगितले जाते.
दरवर्षी हजला येणारे लाखो लोक या विहिरीतील पाणी नक्की सोबत घेऊन जातात. सौदी अरबच्या कायद्यानुसार या विहिरीचे पाणी विकणे हे बेकायदेशीर आहे. पण तरीही इतर देशांमध्ये झमझमचे पाणी म्हणून दुसरे पाणी विकून फसवणूक केली जाते.

आधी दोरीच्या सहाय्याने बादलीद्वारे या विहिरीतून पाणी बाहेर काढले जायचे. पण आता त्यासाठी मोटर आणि पंप लावण्यात आला आहे. त्यामुळे सेकंदाला 8,000 लीटर पाणी येते. वॉटर पंपंद्वारे पाणी मशिदीतील विविध ठिकाणी पहोचवले जाते. त्याठिकाणाहून भावीक पाणी भरतात.

ही विहिर सुमारे 30 फूट खोल आहे. तिचा आकार 1.08 ते 2.66 किमी लांब आहे. हे पाणी हे अगदी स्वच्छ समजले जाते. त्याला कोणताही रंग अथवा गंधही नाही. वैज्ञानिक रिपोर्टनुसार या पाण्याचे पीएच 7.9 ते 8.0 दरम्यान असते. हजारो वर्षे जुनी असूनही ही विहिर कधीही कोरडी पडली नाही, हे या विहिरीचे वैशिष्ट्य आहे. तसेच या पाण्यात कोणत्याही प्रकारची जीवसृष्टीही आढळत नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, काही संबंधित PHOTOS