आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-पाकमधील तणावात ‘सीपीईसी’मुळे पडणार भर; अमेरिकेतील वैचारिक गटाच्या अहवालातील मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अब्जावधी रुपयांच्या चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे (सीपीईसी) चीनची पाकिस्तानमधील उपस्थिती तर वाढेलच, शिवाय भारत-पाकिस्तानमधील तणावातही वाढ होईल, असे मत अमेरिकेतील एका वैचारिक गटाने बुधवारी प्रकाशित अहवालात नोंदवले आहे.

 

विल्सन सेंटरमधील दक्षिण आशिया कार्यक्रमाचे उपसंचालक आणि वरिष्ठ सहयोगी मायकेल कुगलमन यांनी अहवालात म्हटले आहे की, ‘सीपीईसी’ मुळे पाकिस्तानच्या सुरक्षा स्थितीत आणि आर्थिक कार्यक्रमात चीनचा हस्तक्षेप वाढणार आहे. कारण ‘सीपीईसी’ यशस्वी होण्यासाठी तशी पूर्वअटच घालण्यात आली आहे. भारताने या प्रकल्पाला जोरदार विरोध केला असल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमधील तणावात भरच पडणार आहे. भारताला मध्य आशियामधील बाजारपेठ आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांजवळ पोहोचायचे आहे. पाकिस्तानने त्यासाठी आपल्या भूमीचा वापर करू देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारत तेथपर्यंत थेट पोहोचू शकत नाही. आता ‘सीपीईसी’मुळे त्यात आणखी अडथळे निर्माण झाले आहेत.  


अहवालात नमूद करण्यात आले आहे की, ‘सीपीईसी’ला असलेल्या सुरक्षाविषयक धोक्यांबद्दल चीनही चिंतित आहे. पाकिस्तानमध्ये २०१४ नंतर दहशतवाद्यांचा हिंसाचार कमी झाला असला तरी त्यानंतर बलुचिस्तानमध्ये झालेले हल्ले ‘सीपीईसी’च्या प्रस्तावित मार्गावरच झाले आहेत. बलुचिस्तानमध्ये फुटीरवादी बंडखोर अनेक वर्षांपासून हल्ले करत आहेत. अजूनही त्यांचा धोका कायम आहे. त्याशिवाय पंजाब प्रांतात ‘सीपीईसी’च्या प्रकल्पांना गुंडांच्या टोळ्यांकडूनही धोका आहे. २००५ मध्ये पंजाब प्रांतात एका महामार्ग प्रकल्पावर काम करणाऱ्या १२ चिनी अभियंत्यांचे छोटू टोळीने अपहरण केले होते, असा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे.  

बातम्या आणखी आहेत...