आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकावर उपचारासाठी विद्यार्थ्यांनी उभे केले 7.5 लाख रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांचे भवितव्य उत्तम घडण्यासाठी शिक्षक नेहमी झटत असतात. शिक्षकाच्या या उपकारांची थोडीफार परतफेड करण्याचे भाग्य काहींच्याच नशिबात असते. अमेरिकेतील टेक्सास येथे टॉम्बाल ज्युनियर हायस्कूलमध्ये अशीच एक घटना घडली. येथील भाषाकला शिकवणाऱ्या मिशेल विस्ट्रेंड यांना दोन वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले. या शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांना ही बाब कळली तेव्हा त्यांनी शिक्षिकेसाठी निधी जमा करायला सुरुवात केली.  

७.५ लाख रुपये जमल्यावर त्यांनी शिक्षिकेच्या हाती रक्कम देत म्हटले की, या पैशांतून उपचार केल्यावर तुम्हाला फार त्रास होणार नाही. शिक्षिकेने ही बाब सर्वांसमोर सांगितली. त्या म्हणाल्या, ‘एवढ्या चांगल्या मुलांना शिकवण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानते. माझ्या आयुष्यातील हा सर्वात चांगला क्षण आहे, असे मी मानते.’ शिक्षिकेचे हे बोलणे ऐकल्यावर शाळेतील सर्वच विद्यार्थी भावूक झाले. शाळेतील मिकी नोलन या १४ वर्षीय विद्यार्थ्याने मित्रांसोबत ‘गो फंड मी’ या पेजवर या शिक्षिकेवर उपचार करण्यासाठी दान करण्याचे आवाहन केले होते.
} msn.com
 
बातम्या आणखी आहेत...