आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरीच्या पुस्तकात मुशर्रफ महापुरुष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर- एनसीईआरटीच्या एका पुस्तकात पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांना महापुरुष दाखवण्यात आल्याचा आरोप जबलपूर बार असोसिएशनने केला आहे. एनसीईआरटीच्या ‘नैतिक शिक्षण, सामान्यज्ञान व योग’ या पुस्तकाच्या आठव्या पाठात सहा छायाचित्रे देण्यात आली आहेत. त्यातून महापुरुष ओळखण्यास सांगितले आहे. त्यात मुशर्रफ, सोनिया गांधी व दलाई लामांची छायाचित्रे आहेत. दिल्लीच्या गायत्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.एनसीईआरटीने या पुस्तकाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...