आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US निवडणूक : ट्रम्प : भारत, चीनची आगेकूच, हिलरी तर अमेरिकेला शून्यावर आणतील !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास - अमेरिकेत अध्यक्षपदासाठी झालेल्या तिसऱ्या वादात भारतीय अर्थव्यवस्थेपासून रशियन अध्यक्ष पुतीन आणि सिरिया तसेच इराकवर जोरदार चर्चा झाली. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था ८ % दराने वाढत आहे, तर अमेरिकेची फक्त एक टक्क्यापेक्षा थोडी जास्त आहे. जर हिलरी अध्यक्ष झाल्या तर ही वाढ शून्यापेक्षाही कमी होऊ शकते. त्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे धोरण जबाबदार आहे.

लास वेगासमध्ये नेवाडा विद्यापीठात सुमारे ९० मिनिटे दोन्ही उमेदवारांना नऊ मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेले. सत्तेत सहज बदल होण्यासाठी दोन्ही उमेदवार निवडणुकीचा निकाल मान्य करतील का? असा प्रश्न शेवटी विचारला गेला. ट्रम्प म्हणाले ते सस्पेन्स राहील. वेळ आल्यावर सांगेन. विशेष म्हणजे अध्यक्ष बराक ओबामा डेमोक्रॅट आहेत. हिलरी जिंकल्या तर सत्ता याच पक्षाकडे राहील. आतापर्यंतच्या तिन्ही वादांत माध्यमांनी हिलरींचे पारडे मजबूत असल्याचे म्हटले आहे.
मी महिलांचा आदर करतो, असे ट्रम्प यांनी म्हणताच पिकला हशा
ट्रम्प म्हणाले
> मतदारांबाबत : माध्यमे भ्रष्ट, बेइमान आहेत. ते मतदारांच्या मनात विष कालवत आहेत, पण ते आता त्यांना कळत आहे.
> निवडणुकीबाबत : निवडणुकीत प्रत्येक टप्प्यावर गडबड होत आहे.
> निकालाबाबत : वेळ आल्यावर सांगेन मानेन की नाही.
> हिलरींबद्दल : एक नंबरच्या खोट्या, बेशरम. माझ्या सभेत हिंसा करण्यासाठी ओबामा,हिलरी १५०० डॉलर देऊन लोकांना पाठवतात.
> इराकने हिलरींना जिंकवण्यासाठी मोसूलमध्ये मोहिमेला दिली गती.
> हिलरींमुळेच सिरियाच्या अलेप्पोत मुलांची आणि महिलांची हत्या.
> तुम्ही ६ अब्ज डॉलर चोरले, तुम्ही जे बोलता ते करत नाही.
हिलरींचे उत्तर
> निवडणुकीतील गडबडीबद्दल : २४७ वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या उमेदवाराने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
> मोसूलबद्दल : इसिसला रोखणे हे आमचे पहिले उद्दिष्ट. ओसामाला जो न्याय दिला तोच आम्ही बगदादीलाही देऊ.
> ट्रम्पबद्दल : कोणी यांचे म्हणणे मान्य केले नाही की हे घोटाळ्याचा आरोप करतात.
> त्यांनी अनेकदा एफबीआय, न्यायपालिकेला भ्रष्ट म्हटले.
> मी जेव्हा ओसामा बिन लादेनवरील हल्ल्याच्या वेळी सिच्युएशन रूममध्ये होते, तेव्हा ट्रम्प अॅप्रेंटिससोबत आनंदोत्सव साजरा करत होते.
> ट्रम्प अत्यंत धोकादायक व्यक्ती आहेत. त्यांच्या हाती अणुबॉम्बचे बटण देऊ नये.
हिलरींनी केली दोघांची तुलना
जेव्हा मी आफ्रिकी-अमेरिकी मुलांना शाळेत नेत होते तेव्हा यांच्यावर खटले सुरू होते. मी महिलांच्या हक्कावर चर्चा करत होते, तेव्हा हे मिस युनिव्हर्सचा अपमान करत होते.
न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले
अंतिम चर्चेत ट्रम्प यांनी फक्त अमेरिकी मतदारांचा अपमान केला नाही तर अमेरिकी लोकशाहीचाही अपमान केला.
क्लिंटन फाउंडेशनवरही चर्चा
हिलरी म्हणाल्या, मी जे केले, ते देशहितासाठी. उत्तरात ट्रम्प म्हणाले, तुमचे क्लिंटन फाउंडेशन एक क्रिमिनट एंटरप्रायजेस आहे. तुम्हाला सौदी अरेबियाकडून निधी मिळतो.

पुढे वाचा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा...
बातम्या आणखी आहेत...