आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाइम समूहाचे मालक 95 वर्षांत सहाव्यांदा बदलणार; 18 हजार कोटींत ‘टाइम’ची खरेदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- जगभरात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील माध्यम समूह ‘टाइम’ची मेरडीथ कॉर्पोरेशनने खरेदी केली. माध्यम क्षेत्राशी संबंधित मेरडीथ आणि टाइम समूहात १८ हजार कोटींचा व्यवहार झाला. ९५ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा टाइम समूहाची मालकी बदलली आहे. याआधी इनकॉर्पोरेटेड कंपनीकडे समूहाची मालकी होती. 

 

‘मेरडीथ’ने अगोदर दोन वेळा ‘टाइम’ खरेदी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या वेळी मेरडीथला अमेरिकेतील मोठे व्यापारी कॉश ब्रदर्सची साथ मिळाल्याने हा व्यवहार यशस्वी झाला. कॉश ब्रदर्स म्हणजेच चार्ल्स कॉश, डेव्हिड कॉश मीडिया पब्लिकेशनच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अमेरिकेतील प्रमुख ५ कंपन्यांमध्ये कॉश समूहाचा समावेश होतो. १८ हजार कोटींच्या व्यवहारात कॉश ब्रदर्सने ५ हजार कोटी रुपये दिले. टाइमचे सर्वात मोठे उत्पादन असणाऱ्या टाइम मासिकावर आता ‘कॉश’ची छाप पडेल, असे अमेरिकेतील व्यापार आणि माध्यम जाणकारांचे मत आहे. कॉश ब्रदर्स विरोधी पक्ष असलेल्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे समर्थक आहेत. परंतु एका वर्षापासून कॉश डोनाल्ड ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाकडे झुकलेले दिसून येतात. व्यवहाराच्या बातम्या आल्यानंतर टाइम मासिकाचे विज्ञान संपादक चार्ल्स अलेक्झांडर म्हणाले की, कॉश ब्रदर्स आल्यामुळे मासिकाच्या संपादकीय पानावर परिणाम दिसेल. १९२२ मध्ये स्थापन झालेल्या टाइम समूहाचे मासिक, वेबसाइट, इव्हेंट मॅनेजमेंट आणि मास मीडियाचा अशी चार उत्पादने आहेत. यात मासिकाची सर्वाधिक चर्चा होते. मासिकासह स्पोर्ट््स इलस्ट्रेटेड, फॉर्च्युन, पीपल, इनस्टाइल आणि गोल्फ मासिक उच्चभ्रू वाचकांमध्ये प्रसिद्ध आहे. पाच वर्षांत टाइमच्या सर्व मासिकांचे वितरण २० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जगभरात टाइमचे वितरण साडेतीन लाखांवरून ३ लाखांवर आले आहे. २०१५ मध्ये कंपनीने ५०० कर्मचाऱ्यांना कमी केले होते. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, टाइमच्या तुलनेत मेरडीथचा महसूल आणि कर्मचारी कमी...

बातम्या आणखी आहेत...