आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुद्धात असे होते अमेरिकेतील चित्र, जर्मन मिळेल तेथे हल्ला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिका आणि जर्मनीचे शत्रुत्व इतके वाढले की त्याचे पडसाद दोन्ही देशांच्या नागरिकांवर सुद्धा दिसून येत होते. महायुद्धाची आग युरोपमध्ये पसरताच अमेरिकेत राहणाऱ्या जर्मन लोकांचे जगणे कठिण झाले. युद्धाच्या वेळी अमेरिकन नागरिक सर्रास जर्मन नागरिकांचे शोषण आणि दिवसाढवळ्या हत्या करत होते. यात अबालवृद्धांना देखील सोडले जात नव्हते. त्याच काळातील काही फोटोज समोर आले आहेत. 

अमेरिकेत सर्वत्र जर्मन्सवर अत्याचार
- 1914 मध्ये पहिले महायुद्ध भडकले. त्यापूर्वी अमेरिकेत जर्मन नागरिकांचे स्वागत केले जात होते. इंग्लिशनंतर जर्मन अमेरिकेतील प्रमुख भाषा होती. 
- युद्ध सुरू होताच जर्मनीने अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरू केले. यानंतर अमेरिकन नागरिकांच्या मनात जर्मनी विरोधात द्वेष निर्माण झाला. लोकांनी जर्मन नागरिकांचा तिरस्कार सुरू केला. 
- त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले वुड्रो विल्सन यांनी जर्मन निर्वासितांना अमेरिकेचा शत्रू देखील घोषित केले होते. 
- विल्सन यांनी आणखी घोषणा केली, की अमेरिकेत राहायचे असेल तर जर्मन लोकांना आपली ओळख सोडावी लागेल. 
- यानंतर अमेरिकन नागरिकांनी आपल्या देशात राहणाऱ्या जर्मन निर्वासितांची घरे सील करण्यास सुरुवात केली. प्रशासनाने जर्मन निर्वासितांची 50 कोटी अमेरिकन डॉलरची मालमत्ता जप्त केली. 
- जर्मन नागरिकांना शाळा, महाविद्यालये आणि नोकऱ्यांवरून काढण्यात आले. जर्मन भाषेवर सुद्धा बंदी लावली. 
- अमेरिकेत कुठल्याही ठिकाणी जर्मन नागरिकांवर हल्ले आणि त्यांचे खून सुरू झाले. जर्मन भाषा बोलताना किंवा वाचताना आढळल्यास रस्त्यावर काढून बेदम मारहाण केली जात आहे. जमावाकडून जर्मन नागरिकांच्या हत्या रोजच्या झाल्या होत्या. 
- सरकारने सुद्धा कित्येक जर्मन निर्वासितांना नजरकैद केले. युद्ध संपल्यानंतरही त्यांना सोडण्यात आलेले नव्हते.
 
पुढील स्लाईच्सवर पाहा आणखी काही फोटोज
बातम्या आणखी आहेत...