आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Woman Who Killed Her Husband Was In Prison, The Court Objected To The President's Apology, And Now Her Voice In The Streets

पतीची हत्या करणाऱ्या महिलेला झाली कैद, राष्ट्रपतींच्या माफीवर कोर्टाने घेतला आक्षेप, आता तिच्या सुटकेसाठी रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस : घरगुती हिंसा वा कौटुंबिक हिंसेमुळे त्रस्त होऊन पतीची हत्या करणारी जॅकलिन सोवेज हिच्या समर्थनार्थ फ्रान्समधील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. ६८ वर्षीय जॅकलिनला कोर्टाने (न्यायालयाने) १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी तिची शिक्षा माफही केली आहे, पण न्यायालयाने ओलांद यांची माफी फेटाळून उडवून लावली आहे.
खरे पाहता जॅकलिनने स्वत:सह आपल्या तीन मुलींवर होत असलेल्या अत्याचारास कंटाळून २०१२ मध्ये पती नोर्बट मेरोटला गोळी मारली होती. न्यायालयाने २०१५ मध्ये तिला दोषी ठरवून १० वर्षांची कैदेची शिक्षा सुनावली होती.
यानंतर फ्रान्सच्या हजारो महिला जॅकलिनच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या. या महिलांनी जॅकलिनची शिक्षा माफ करण्यासाठी पॅरिससह संपूर्ण फ्रान्समध्ये रस्त्यांवर उतरून निदर्शने केली.

अशा या दीर्घ विरोधी निदर्शनानंतर या वर्षी जानेवारीत राष्ट्रपतींनी जॅकलिन हिची शिक्षा माफ करण्याचा आदेश दिला होता, पण न्यायालयाने राष्ट्रपतींचा हा आदेश फेटाळून लावला. या कारणामुळे जॅकलिन जेलमध्येच राहिली. पण महिला तिच्या बाजूने रस्त्यावर उतरल्या.

सोडवण्यासाठी भुयारचा प्रयत्न : काही महिन्यांपूर्वी रॅडिकल फेमिनिस्ट कार्यकर्त्यांच्या समूहाने जॅकलिनला सोडविण्यासाठी जेलच्या बाहेर एक भुयार तयार करण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी या प्रयत्नास अयशस्वी करून टाकले.
मुलाच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी पतीला गोळी घातली, लैंगिक शोषणाला कंटाळून कृती
जॅकलिन (इन्सेटमध्ये) चा नवरा दारुड्या होता. तो अनेक वर्षांपासून पत्नीला मारझोड करत असे. तीन मुली आणि एका मुलाचे तो लैंगिक शोषण करत होता. यामुळे कंटाळून १० सप्टेंबर, २०१२ रोजी मुलाने आत्महत्या केली होती. मुलाच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी जॅकलिनने गोळी मारून पतीची हत्या केली होती. जॅकलिनच्या मुली पित्याच्या हत्येला सर्वात मोठी सुटका मानताहेत. यानंतर ती घरगुती कौटुंबिक हिंसा पीडितांची प्रतीक झालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...