आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 20 सर्वात तणावग्रस्त शहरांत 4 भारतीय, दिल्ली 9 व्या क्रमांकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगात सर्वाधिक तणावग्रस्त आणि सर्वात कमी ताण असलेले शहर कोणते याबाबत नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार, सर्वाधिक तणावग्रस्त 20 शहरांपैकी 4 भारतीय शहर आहेत. यात नवी दिल्ली चक्क जगात 9 व्या क्रमांकाचे तणावग्रस्त शहर ठरले आहे. तर, मुंबई 13 व्या, कोलकाता 19 व्या आणि बेंगळुरू 20 व्या क्रमांकावर आहे. जगात पहिल्या क्रमांकाचा तणावग्रस्त शहर म्हणून इराकची राजधानी बगदादचे नाव घोषित करण्यात आले आहे. सर्वात कमी ताण-तणाव असलेल्या शहरात जर्मनीचे स्टटगार्ट शहर पहिल्या स्थानी आहे. 
 

सर्वात कमी तणाव असलेल्या 10 शहरात 4 जर्मन
- तणावग्रस्त आणि सर्वात कमी ताण-तणाव असलेल्या शहरांची यादी काढण्यासाठी 500 शहरांचा अभ्यास करण्यात आला. यात 17 कॅटेगरी होत्या. त्यामध्ये मानसिक शांतता, बँक बॅलेन्स आणि नोकरीची हमी इत्यादींचा समावेश होता. त्यामध्ये जर्मनी एकूणच सर्वात चांगले राष्ट्र ठरले आहे. 
- टॉप-10 सर्वात कमी ताण असलेल्या शहरांत 4 जर्मनीतील शहरे आहेत. तर, सिडनी हे एकमेव शहर आहे जे युरोपियन नाही. 
- सर्वेक्षणात पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, स्टटगार्ट शहरात सर्वात कमी ताण-तणाव असलेले शहर असून येथील लोकांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. 
- या शहरांमध्ये पॉर्श, बॉश आणि मर्सेडीज बेंझच्या कंपन्या आहेत. तसेच या शहरांमध्ये सर्वाधिक हरीतक्षेत्र आहे.
 

झाडांमुळे कमी होतो स्ट्रेस
- सर्वेक्षणात स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, शहरात तणाव कमी करण्यासाठी ग्रीन झोन आणि झाडांची संख्या अधिक असणे आवश्यक आहे. त्यातही आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक सुरक्षिततेची भावना सुद्धा महत्वाची आहे. 
- सिंगापूर आणि तायपेई शहरात राहणाऱ्या लोकांच्या मते ते सर्वाधिक समाधानी आहेत. जर्मीनीतील लिपजिग आणि फ्रान्सच्या मॉन्टपेलियारे शहराताली लोकांच्या मते त्यांच्या शहरात ट्रॅफिक खूप कमी आहे. 
- राहण्यासाठी सर्वात सुरक्षित शहरांमध्ये अबुधाबी पहिल्या आणि जपानचे ओसाका शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
- सर्वात कमी लोकसंख्या असलेले शहर अमेरिकेतील मायामी आहे. तर, लक्झेमबर्ग मानसिक समाधानात प्रथम क्रमांकावर आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सर्वात कमी आणि सर्वाधिक तणाव असलेल्या शहरांची यादी....
बातम्या आणखी आहेत...