आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क- प्रसिद्ध कलाकार लियोनार्दो द विंची यांच्या ५०० वर्षे जुन्या पेंटिंगची अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये विक्री झाली. क्रिस्टीजने लिलाव केलेली ही जगातील सर्वात महागडी पेंटिंग ठरली असून यासाठी ३ हजार कोटींची बोली लावण्यात आली. या पेंटिंगमध्ये जीसस क्राइस्टला दाखवण्यात आले आहे. पेंटिंगला साल्वाडोर मुंडी (जगाचा संरक्षक) असे नाव दिले गेले आहे. लिलाव २० मिनिटे चालला.
ही पेंटिंग पंधराव्या शतकातील इंग्लंडचा राजा चार्ल्स (पहिला) याची संपत्ती होती, असे मानले जाते. चार वर्षांपूर्वी रशियाचा कलाप्रेमी दमित्री ई रयाबोलोव्लेवने १२.७ कोटी डॉलर म्हणजे जवळपास ८२५ कोटींमध्ये या पेंटिंगची खरेदी केली होती. १९५८ मध्ये लंडनमध्ये या पेंटिंगचा ६० डॉलरमध्ये लिलाव झाला होता. त्यावेळी ही पेंटिंग द विंची यांच्या एखाद्या शिष्याने बनवल्याचे मानले जात होते. याचा लिलाव करणाऱ्या जुसी पिल्लकननने सांगितले की, लिलाव प्रक्रियेसाठी सेल्स हाऊसमध्ये जमलेल्या दर्शकांमध्ये प्रचंड उत्साह होता. एकवेळ पेंटिंगची शेवटची बोली १३०० कोटींवर येऊन थांबली होती. त्याच वेळी कोणीतरी फोनच्या माध्यमातून बोली पुढे वाढवण्यास सांगितले.
अखेरीस २,९४० कोटींवर बोली थांबली. मोठ्या रकमेवर पेंटिंग विकल्या गेल्याने ही आतापर्यंतची सर्वात महागडी कलाकृती ठरली आहे. तसा विक्रम झाला आहे.
याआधी पाब्लो पिकासोची वुमेन ऑफ अल्जियर्स नावाची पेंटिंग सर्वात महागडी पेंटिंग ठरली होती. दोन वर्षांपूर्वी जवळपास ११०० कोटींमध्ये याचा लिलाव झाला होता. एक तज्ज्ञ आणि समीक्षकांच्या मते, पेंटिंगच्या पृष्ठभागावर अनेकदा काम झाल्याने एकाच वेळी ती नवीन आणि जुनी वाटते. १९ व्या शतकातील कलाकृतीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. टीम हंटर यांनी या पेंटिंगला २१ व्या शतकातील मोठा शोध मानतात. लियोनार्दो १५१९ मध्ये फ्रान्स फ्रान्समध्ये निधन झाले होते.
पेंटिंग विकत घेणाऱ्याच्या नावाबद्दल गुप्तता
विंची यांच्या या पेंटिंगसाठी ६ लोकांनी बोली लावली. सर्वाधिक बोली २,९४० कोटींची होती. पेंटिंग विकत घेणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. पेंटिंग खरेदी करणारा न्यूयॉर्क येथे लिलावादरम्यान २० मिनिटापर्यंत फोनवर बोलत होता. याच वेळी त्याने ४० कोटी डॉलर म्हणजे जवळपास २,६०० कोटी रुपयांची अंतिम बोली लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.