आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात पहिल्‍यांदाच रोबोटने साकारली चित्रपटात मुख्‍य भूमिका, जपानची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायिकेच्‍या भूमिकेत असलेला रोबोट (झाडाला टेकून बसलेला) - Divya Marathi
नायिकेच्‍या भूमिकेत असलेला रोबोट (झाडाला टेकून बसलेला)
टोकिओ - टर्मिनेटर आणि आयरन मॅन या चित्रपटांच्‍या सीरीजमध्‍ये आतापर्यंत आपण रोबोटच्‍या भूमिकेत अभिनेता पाहिला. एवढेच नव्हे तर भारतातही प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांनी 'रोबोट' या हिंदी चित्रपटात केलेली रोबोटची भूमिका खूप गाजली. पण, आता खरोखर जगात पहिल्‍यांदाच रोबोटने मनुष्‍याची भूमिका साकारली आहे. एवढेच नव्हे तर ही भूमिका चित्रपटाच्‍या मुख्‍य नायिकेची आहे. त्‍यात या रोबोटने मनुष्‍याप्रमाणेच अभिनय केला आहे. जपानमध्‍ये या चित्रपटाचे चित्रकरण पूर्ण झाले असून, त्‍याचे नाव 'सायोनारा' आहे. येत्‍या 21 नोव्‍हेंबरला तो प्रदर्शित होणार आहे.
रबराची त्‍वचा आणि महिलेसारखा चेहरा
> चित्रपटात भूमिका केलेल्‍या या एंड्रॉयड रोबोटचे नाव जेमिनॉयड एफ असे आहे. त्‍याला रबराची त्‍वचा बसवण्‍यात आली. त्‍याचा चेहरा महिलेसारखा आहे. कुणीही पाहिल्‍यावर ही एक महिलाच आहे, असे वाटते.
> हा रोबोट अभिनेता या चित्रपटात डिसेबल कॅरेक्टरच्‍या रूपात व्‍हीलचेअरवर दिसणार आहे. या पात्राचे नाव लियोना असे आहे.
> फिल्ममध्‍ये लियोना म्‍हणजेच जेमिनॉइड एफ याला एका अभिनेत्रीच्‍या रुपात दिग्‍दर्शक कोजी फुकादा प्रोजेक्ट करत आहेत. एवढेच नाही तर चित्रपटाच्‍या नामावलीतही त्‍याचा उल्‍लेख करण्‍यात आला आहे.
ख्‍यातनाम अभिनेत्‍याच्‍या मानधना एवढी किंमत
या रोबोटची किंमतसुद्धा ख्‍यातनाम अभिनेत्‍याच्‍या मानधनाएवढी आहे. त्‍याचे डिजाईन जापानमधील ओसाका विद्यापीठाचे हिरोशी इशीगुरो यांनी तयार केले आहे. त्‍याची किंमत 776,000 पाउंड (7 कोटी 87 लाख रुपये) आहे.

> हा रोबोट मनुषाप्रमाणे हसू शकतो. संकोच व्‍यक्‍त करू शकतो. चेहराही हलवू शकतो. एवढेच नाही तर तो बोलतो आणि गातोही.
> रोबोटमध्‍ये मोटराइज्ड ऐक्युएटर (प्रवर्तक) लावले आहे. एयर प्रेशरने ते नियंत्रित होते.
> यामुळे रोबोटला मानवी चेहऱ्यावरील भावनांची नक्‍कल करत येते.
> चित्रपटात त्‍याच्‍याकडून भूमिका करून घेताना लॅपटॉपवरून रिमोटच्‍या माध्‍यमातून कंट्रोल केले गेले.
काय आहे अँड्रॉइड रोबोट?
अँड्रॉइड एक ह्यूमनॉएड रोबोट आहे. त्‍याचे दिसणे, हावभाव अगदी मनुष्‍याप्रमाणे आहे. सामान्‍य रोबोट मनुष्‍याप्रमाणे दिसत नाही. त्‍याला पाहताच तो एक यंत्र आहे, हे लक्षात येते. मात्र, अँड्रॉइड रोबोड मनुष्‍याप्रमाणे दिसतो. हा मुख्‍य फरक आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जापानच्‍या चित्रपटात लीड रोल करणाऱ्या रोबोटचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...