आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील सर्वात मोठे विमान, 48 प्रवाशी घेऊन उडणार 20 हजार फुट उंच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनच्या \'हाय‍ब्रीड एअर व्हेईकल्स\' कंपनीने बनवले आहे. - Divya Marathi
ब्रिटनच्या \'हाय‍ब्रीड एअर व्हेईकल्स\' कंपनीने बनवले आहे.
लंडन - जगातील सर्वात मोठ्या विमानाचे नवीन छायाचित्रे प्रसिध्‍द करण्‍यात आले आहे. या विमानाचे नाव आहे 'एअरलँडर 10' असे. काही दिवसांनंतर त्याची चाचणी घेतली जाणार आहे. ब्रिटनची 'हायब्रिड एअर व्हेईकल्स' कंपनीने विमानाचे डिझाइन तयार केले आहे. हवेत वर नेण्‍यासाठी हेलियमचा वापर केला जाईल. यामुळे विमान सलग तीन आठवड्यांपर्यंत हवेत राहू शकेल. यास रिमोटने नियंत्रित केले जाऊ शकते. त्याचा वेग जास्तीत 148 किलोमीटर पर तास असेल. कसा असेल एअरलँडर?...
> लांबी - 92 मीटर
> रुंदी - 44 मीटर
>उंची - 26 मीटर
>गती - 148 किलोमीटर प्रति तास
>ऊर्जा - 4 ते 350 अश्‍वशक्ती, 4 लिटरचे 8 डायरेक्ट इंजेक्शन, टर्बोचार्ज्ड डिझेल इंजन
किती उंच जाणार - 20 हजार फुट
किती लोक बसू शकतील - 48 प्रवाशी आणि क्रू मेंबर्स
पहिल्या महायुध्‍दाचे विमान हँगरमध्‍ये बनवले गेले
- ब्रिटनमधील बर्डफोर्डशायर येथील पहिल्या महायुध्‍दाच्या विमान हॅंगरमध्‍ये या विमानाची निर्मिती करण्‍यात आली आहे.
- त्याचा वापर पाहाणी, दळणवळण, कार्गो आणि नागरी वाहतूकीसाठी केला जाईल. यात एकाच वेळ 48 प्रवाशी प्रवास करु शकतात.
- यात 1.3 दशलक्ष घन फुट हेलियम भरले जाईल. जे ऑलिम्पिक आकाराचे 15 जलतरंग तलाव भरण्‍यास पुरेसे आहेत.
- हे विमान पाणी किंवा बर्फावर तसेच इतरही ठिकाणीही उतरु शकते.
- आवाज न करता आणि प्रदूषण न करता हे विमान प्रवास करु शकते.
- 2018 पर्यंत कंपनी 12 एअरलँडर बनवणार आहे.
पहिल्या अमेरिकन लष्‍करासाठी बनवण्‍यात आले होते एअरलँडर
- 2009 मध्‍ये अमेरिकन लष्‍कराच्या सर्व्हिलन्स प्रकल्पांतर्गत ते विकसित करण्‍यात आले होते. मात्र 2012 निर्मितीचे काम थांबवले.
पुढील स्लाइड्सवर एअरलँडरची 10 छायाचित्रे...