आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात निर्जन भागात सर्वात मोठा संगीत महोत्सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - हे छायाचित्र ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँडच्या सिम्पसन वाळवंटाचे आहे. तेथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ४ ते ६ जुलैदरम्यान बर्ड् सविले बिग रेड बॅश आयोजित करण्यात आला. हा एक संगीत महोत्सव आहे. तो गेल्या ५ वर्षांपासून सिम्पसन वाळवंटात होत आहे.
 
विशेष म्हणजे जगातील सर्वात दुर्गम आणि निर्जन भागात होत असलेला हा सर्वात मोठा संगीत महोत्सव आहे. बर्ड् सविलेे ही फक्त १०० लोकांची छोटीशी नागरी वस्ती आहे. हा भाग ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या शहरांपासून म्हणजे सिडनीहून १९०० किमी, ब्रिस्बेनहून १६०० किमी आणि अॅडिलेडहून सुमारे १२०० किमी दूर आहे. बहुतांश लोक चारचाकीने येतात. या वेळी ७ हजारपेक्षा जास्त लोक आले होते.  
 
- वाळवंटाची व्याप्ती १.७६ लाख किमी  
१ लाख ७६ हजार चौरस किमी व्याप्ती असलेले सिम्पसन वाळवंट हे ऑस्ट्रेलियातील चौथे सर्वात मोठे वाळवंट आणि वाळूच्या टेकड्या असणारे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. त्यात ३ मीटर ते ४० मीटर उंच वाळूच्या टेकड्या आहेत.
 
पुढील स्लाइडवर, ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक आवडता कार्यक्रम, पुरस्कार मिळाला...
बातम्या आणखी आहेत...