आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेरेसा यांनी पतीसोबत घालवली सुटी अन् चालता बोलता घेतला मध्यावधीचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी गेल्या आठवड्यात मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली होती. तेव्हा त्यांच्या समर्थकांपासून विरोधकांपर्यंत सगळेच चकित झाले होते. खरे तर त्या २०१९ पर्यंत निवडणुकीशिवाय पंतप्रधान म्हणून राहू शकत होत्या. मग त्यांनी हा निर्णय का घेतला? ब्रिटिश माध्यमांनी त्यांचा निर्णय ‘वॉक अँड टॉक’ शैलीशी जोडला आहे.  
 
थेरेसा पाच ते नऊ एप्रिलपर्यंत सुटीवर होत्या. वेल्सच्या डॉग्लेयूमध्ये पती फिलिप यांच्यासोबत घालवली. ‘द गार्डियन’ने त्यांचे भटकंती करतानाची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. छायाचित्राखाली ‘ निर्मनुष्य वाटेवरील पावले..’ अशा आेळी लिहिलेल्या होत्या. तुम्हाला काही गोपनीय चर्चा करायची इच्छा असल्यास अशा शांत मार्गावरून वाटचाल केली पाहिजे, असा सल्लाही वृत्तपत्राने दिला आहे. विशेषत: अतिशय महत्त्वाच्या निर्णयाच्या बाबतीत अशा पद्धतीने शांततापूर्ण मार्गाने फिरणे श्रेयस्कर ठरते, असे वृत्तपत्राने नमूद केले आहे. थेरेसा यांनी कदाचित या वॉक द टॉकदरम्यान मध्यावधी निवडणुकीचा निर्णय घेतला असावा, असा अंदाजही वृत्तपत्राने लावला आहे. सुटीवरून परतल्याच्या एक दिवसानंतर १० एप्रिलला थेरेसा यांनी महाराणींशी चर्चा केली. 
 
निवडणुकीच्या आपल्या निर्णयाबद्दल त्यांना अवगत केले. त्यानंतर आपल्या जवळील लोकांना त्याची माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करून घेतले. त्यानंतर १८ एप्रिलला जाहीरपणे मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली. थेरेसा या निर्णयाबद्दल म्हणाल्या, मी या निर्णयावर खूप विचार केला आहे. 
 
देशाचे भविष्य व स्थैर्याच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, असे मला वाटले. थेरेसा पतीसमवेत एका हॉटेलमध्ये मुक्कामी होत्या. त्या हॉटेलचे मालक म्हणाले, पंतप्रधान येण्यापूर्वी सगळे काही व्यवस्थित असावे यासाठी आम्ही खूप तणावाखाली होतो. परंतु त्या आल्या तेव्हा त्या अगदी सामान्य वाटल्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. मात्र राजकारणावर त्या काही बोलल्याही नाहीत आणि काही विचारलेही नाही.  
बातम्या आणखी आहेत...