आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या या 14 छायाचित्रांवरुन नवा दावा, मंगळावर दिसले एलियन्सचे साहित्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - एलियनच्या अस्तित्वाबाबत तपास करणारी युएफओ हंटर्स रोज नवनवीन दावे करत आहे. नासाच्या एका छायाचित्रात मंगळग्रहावर जपानच्या कोफून एरा टॉम्बसारखे स्तूप दिसल्याचा दावा केला आहे. युएफओ हंटर्सनुसार कधीकाळी एलियन्स मंगळावर राहत असल्याचा पूरावा आहे. त्यांचा दावा आहे, की युध्‍दानंतर एलियन्स येथून पृथ्‍वीवर येऊन स्थायिक झाले. मात्र नासाने याला दुजोरा दिलेला नाही.
संशोधक काय म्हणतात?
नासा सुरुवातीपासून अशा कोणत्याही कथित शोध मान्य केलेला नाही. दुसरीकडे अनेक संशोधकांच्या म्हणण्‍यानुसार ही एक पेअरीडोलियाच्या रुपात ओळखली जाणारी एक मनोवैज्ञानिक स्थिती आहे. यात डोळ्यांना परिचित वस्तू व आकाराचा भास होतो. दगडांच्या ढिगा-यात बूटांच्या आकाराची दिसणारी वस्तू दुसरा दगडही असू शकतो.
पूर्वीही केले गेलेत असे दावे
- यापूर्वीही क्योरियोसिटी रोव्हरने पाठवलेल्या छायाचित्रांवरुन वेगवेगळे दावे करण्‍यात आले आहेत.
- क्युरोसिटी रोव्हर्सने घेतलेल्या मंगळाच्या एका छायाचित्रात एलियन दिसल्याचा दावा केला गेला होता.
- युट्यूब युजर पॅरानॉर्ल क्रूसिबलचा दावा होता, की दगडाच्या कड्यासारखा दिसणारी छोटीशी वस्तू माणसाप्रमाणे दिसणा-या एलियनचे आहे.
- एका दशकापूर्वी हे चिलीच्या अटाकामा वाळवंटातून मिळालेला 6 इंचांचा अनोखा सापळा विशिष्‍ट प्रजातीचा असल्याचे सांगितले होते.
- यानंतर युट्यूब चॅनल Luxor2012UFO ने नासाच्या एका छायाचित्रात घराचा आकार दिसल्याचा दावा केला आहे.
- गेल्या दिवसांमध्‍ये एलियन हंटर्सने नासाने जारी केलेल्या मंगळाच्या छायाचित्रांमध्‍ये महिला, लष्‍करी बंकर, एलियन हंटर - खेकडा, शेवपेटी आणि इतर वस्तू दिसल्याचा दावा केला.
- नासा एलियन्सविषयी माहिती सामोर आणू इच्छित नाही, असा आरोप एलियन हंटर्सने केला आहे.
- मात्र नासा अशी मांडणी व दावे फेटाळत आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा नासाच्या कोणत्या छायाचित्रांवरून युएफओने केलेत एलियन्स अस्तित्वात असल्याचे दावे...
बातम्या आणखी आहेत...