आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : एस्कलेटरचे अपघात सुरूच, आता अडकला चिमुकल्याचा हात, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये आणखी एका एस्कलेटरच्या अपघाताची घटना समोर आली आहे. आता हुनान प्रांतात ऑटोमॅटिक पाऱ्यांवर एका चिमुरड्या मुलाचा हात अडकला. ही घटना 2 ऑगस्टची आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, शांग्साच्या यीलू येथील सुपरमार्केटमध्ये एस्कलेटरवर पडल्याने एका तीन वर्षीय मुलाचा हात त्यात अडकला. हा चिमुकला त्याच्या आईबरोबर सुपरमार्केटमध्ये आला होता.

यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर त्या मुलाचा हात बाहेर काढला. या संपूर्ण प्रकारादरम्यान त्या चिमुरड्याची आई त्याचा हात पकडून त्याचठिकाणी बसून होती.

चीनमध्ये एस्कलेटरवर होणा-या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे 26 जुलैला हुबेई प्रांतात एका 30 वर्षीय महिलेचा एस्कलेटरमध्ये अडकल्याने मृृत्यू झाला होता. तर एक ऑगस्टला शांघायमध्ये दुसऱ्या एका घटनेत एक स्वच्छता कर्मचा-याचा पाय एस्कलेटरमध्ये फसला होता. त्यात हा स्वच्छता कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जखमी झाला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, यापूर्वी घडलेल्या घटनेचे PHOTO