आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या फक्त अपयशी लाेकांनाच देत अाहेत नोकरी, त्यांचीही झाली होती हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - समजा, तुमचे करिअर नुकतेच सुरू झालेय आणि सलग दोन कंपन्यांनी तुम्हाला कामावरून काढले आहे. अर्थातच तुम्ही निराश व्हाल. न्यूझीलंडच्या सारा रॉब हेगन यांच्यासोबतही असेच झाले. त्यांना आधी व्हर्जिन कंपनीने सन २००० मध्ये मार्केटिंगच्या कामावरून हटवले. त्यानंतर अटारी इंटरॅक्टिव्ह कंपनीनेही दोन वर्षे नोकरीनंतर नारळ दिला.

त्या जेव्हा ऑफिसमधून बाहेर पडू लागल्या तेव्हा सहकारी त्यांना पाहत होते. त्यांना हे लाजिरवाणे वाटते. सारा म्हणाल्या, ते खूपच वाईट दिवस होते. एकदा तर आता सगळं संपलं, असे मला वाटले. मात्र, मी मन घट्ट केले. सारं काही विसरून पुन्हा उभे राहिले आणि २००२ मध्ये नाइके कंपनीत जनरल मॅनेजर झाले. तेथे सहा वर्षे काम केल्यानंतर २००८ मध्ये गॅटोरेड या कंपनीत अध्यक्ष, २०१२ मध्ये इक्विनॉक्स कंपनीत अध्यक्षपदी रुजू झाले. महिनाभरापूर्वीच ४३ वर्षांच्या सारांनी नोकरी सोडून स्वत:ची ‘एक्स्ट्रिम यू’ ही स्टार्टअप कंपनी लाँच करण्याचा निर्णय घेतला. अपयशातून शिकून पुढे वाटचाल करणाऱ्यांना सारा ‘एक्स्ट्रिमर’ संबोधतात. ‘एक्स्ट्रिम यू’हा एक कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. येथे लोकांना प्रेरित करणारी व शैक्षणिक सेवा दिल्या जातील. आयुष्यात कधी ना कधी अपयशी झालेल्यांना सारा नोकरी देत आहेत. त्या म्हणाल्या, मला अशा माणसाला नाेकरी द्यायची आहे जो नोकरीवरून काढलेला असेल. जो इमानदारीने सांगेल की काय आणि का घडले होते आणि त्या घटनेतून तो काय शिकला.

सारा ‘एक्स्ट्रिम यू’ हे पुस्तकही लिहीत आहेत. यासाठी त्यांनी अनेक हायप्रोफाइल व यशस्वी एक्झिक्युटिव्ह, शेफ आणि अॅथलिट्सच्या मुलाखती घेतल्या. संशोधनादरम्यानच त्यांना वाटले की, या लोकांच्या अनुभवाचा फायदा ज्यांनी नुकतेच करिअर सुरू केले आहे त्यांना होईल. सारा म्हणतात, आजच्या पिढीकडे जग आणखी सुखकर करण्याची विचारसरणी आहे. परंतु ती बदल घडवण्यात अपयशी ठरतेय. तिची मानसिकता प्रमोशन मिळवण्याचीच आहे. त्यांना वाटते की काहीही न करता सर्वकाही आपोआपच मिळेल.

अपयशी लाेकांवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत. कारण, ज्यांनी प्रत्यक्ष अपयश सोसले आहे, त्यांच्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता असते. जे कधी हरले नाहीत ते कधीच विजयासाठी प्रेरित होत नाहीत. या विश्वासाचे कारण म्हणजे मी स्वत: अपयशी ठरलेले आहे. एक नव्हे अनेकदा...- सारा रॉब हेगन
बातम्या आणखी आहेत...