आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशाने एका झटक्यात मारले होते अमेरिकेचे हजारो सैनिक, असा घेतला बदला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने अचानक अमेरिकेच्या पर्ल हार्बर नौदल तळावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात एकाच झटक्यात अमेरिकेचे 2403 सैनिकांचा मृत्यू झाला. तसेच इतर 1178 सैनिक सुद्धा जखमी झाले. जपानच्या हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात अमेरिकेच्या 18 युद्धनौका आणि 328 विमान सुद्धा बेचिराख केले. अमेरिकेने त्याचा बदला जपानच्या हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून घेतला होता. 

 

> 7 डिसेंबर 1941 च्या सकाळी हजारो सैनिक तैनात असलेल्या अमेरिकेच्या पर्ल हार्बर नौदल तळावर अचानक मोठ-मोठ्या घंटा वाजण्यास सुरुवात झाली. अमेरिकेचे नौदल इकडे-तिकडे पाहतच होते, की अचानक त्यांना आकाशात शेकडो जपानी विमान दिसून आले. त्या विमानांतून आग बरसत होती. 
> जपानी कमांडर मिस्तुओ फुचिदाच्या नेतृत्वात 183 फायटर जेट्सने अमेरिकेच्या ओहायो येथे युद्धनौका, विमान आणि विमानवाहक युद्धनौकांचा देखील एका झटक्यात कोळसा केला. 
> दुसऱ्या ताफ्याचे नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट कमांडर शिगेकाजू शिमाजाकीच्या नेतृत्वातील 171 विमानांनी पर्ल हार्बरवर हल्ला केला. 
> उल्लेखनीय बाब म्हणजे, अमेरिकेचे लोक रविवारी विश्रांती घेऊन मौज-मज्जा करतात याची जपानला माहिती होती. त्यामुळेच हल्ल्यासाठी रविवारचा दिवस निवडण्यात आला होता. 
> नौदल तळावर कुणालाही काही लक्षात येण्यापूर्वीच 2403 सैनिकांचा मृतदेहांचा खच पसरला होता. यात कित्येक सैनिकांचा बुडून आणि होरपळून मृत्यू झाला. 


मग काय घडले..?
> अमेरिकेचे पॅसिफिक फ्लीट (ताफा) आपल्यावर हल्ल्यासाठी निघत असल्याचा भास जपानला झाला होता. ताफा निघण्यापूर्वीच ते नष्ट करण्याच्या हेतून जपानने पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला होता.
> या बॉम्बिंग सोबतच जपानने अमेरिका विरोधात युद्धाची घोषणा केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी डिसेंबरचा दिवस काळा दिवस म्हणून घोषित केला. 
> हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात उडी मारण्याचा निर्णय घेतला. तसेच जपान विरोधात युद्धाची घोषणा केली. 
> याचा बदला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून घेतला होता. याच अणुबॉम्ब हल्ल्याने अमेरिकेने दुसरे महायुद्ध संपवले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 7 डिसेंबर 1941 रोजी झालेल्या जपानच्या हल्ल्याचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...