आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाच्या 23 व्या वर्षी पाहिले 30 देश, जगभ्रमंती करून लाखो कमावते ही तरुणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आयुष्यभर राब-राब करून एक-एक पैसा जोडणे आणि त्यातूनच बचत करून एखाद्या टूरिस्ट स्पॉटला जाऊन सुट्ट्या घालवणे 8 ते 5 ची ड्युटी करणाऱ्या बहुतांश लोकांचे स्वप्न असते. मात्र, जगात असेही लोक आहेत की ते जणू फिरण्यासाठीच जन्मले आहेत. ते कुठले राजकुमार किंवा राजकुमारी नसले तरीही त्यांची लाइफ खरोखर रॉयल आहे. जगातील कानाकोपरा चाळून येण्यासाठी आणि मस्त एन्जॉय करण्यासाठी त्यांना पैसे देखील मिळतात. हेच त्यांचे काम आहे. त्यापैकीच एक ट्रॅव्हेल ब्लॉगर आहे टारा व्हाइटमन... अवघ्या 23 वर्षांची विद्यार्थिनी टारा आतापर्यंत 30 देश फिरून आली आहे. 


टारा सध्या ऑस्ट्रेलियात राहते. इंस्टाग्रामवर तिचे 8,40,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. जगभ्रमंती करत असताना सुंदर स्थळांचे आणि खाद्यपदार्थांचे फोटोज पोस्ट करून ती लाखोंची कमाई करत आहे. आपल्यासारखी ड्रीम लाइफ जगायची असल्यास आपले मोबाईल सोडा आणि फिरायला निघा, आसपासचे जग खूप सुंदर दिसेल असे टाराचे म्हणणे आहे. इंस्टाग्राम आणि ब्लॉगवर शेकडो फोटो असले तरीही बऱ्याचवेळा आपण अनेक ठिकाणी कॅमेरा किंवा फोन घेऊन जात नाही असा दावा ती करते. ती आपल्या ब्लॉग Tara Milk Tea वर आपल्या फॅन्सला पर्यटनाचे सल्ले देते. आयुष्यात आपण काहीही झाले तरी फिरणे कधी सोडणार नाही. विविध देश आणि संस्कृती पाहूण आयुष्यात खूप शिकायला मिळते. भविष्यात मी काय करणार हे अद्याप ठरवलेले नाही. पण नक्कीच वर्षातून एकदा तरी न जमल्यास दोन वर्षांतून एकदा का होत नाही, जगभ्रमंती करत राहणार असे टाराने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...