आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे धाडसी पायलट करतात ISIS च्या तळांवर हल्ले, वाचा कोण काय म्हणतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणच्या खाडीमध्ये तैनात असलेल्या यूएसएस थिओडोर रुझवेल्ट युद्धनौकेतून- अमेरिकी हवाई दल हे नौदलाच्या बरोबरीने आयएसच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत आहे. त्यांच्या पायलट्सनी इराक आणि सिरियामध्ये एका वर्षात ४७०० हून अधिक हल्ले केले आहेत.

अमेरिकेतील शक्तिशाली युद्धनौका इराणच्या खाडीत ऑगस्ट २०१४ पासून तैनात करण्यात आली आहे. सिरिया आणि इराकमध्ये असलेल्या आयएसच्या ठिकाणांवर बॉम्बगोळे टाकण्याचे त्यांचे मिशन आहे. अमेरिकी नौसेनेचे निष्णात पायलट या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट्स विमानांना युद्धनौकेतून एकदा बाहेर झेप घेतल्यानंतर सहा ते साडेसहा तास हवेतच असावे लागते. सर्वसामान्य नागरिकांचा या हल्ल्यातून बचाव करण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असते.

मी नेव्ही लेफ्टनंट मायक स्मेलवूड (कोडनेम -बोन्स) यांचे उदाहरण देत असते. ते एक चांगले पायलट आहेत. एकदा त्यांनी त्यांची रूममेट नेव्ही लेफ्टनंट निक स्मिथ (कोडनेम यिप यिप)च्या सोबत उड्डाण केले. काही वेळानंतर लेफ्ट. स्मिथ यांच्या विमानातील इंजिनामध्ये बिघाड झाला. ते वेगाने खाली येऊ लागले. लेफ्ट. स्मेलवूड यांनी अापल्या सहकाऱ्यास युद्धनौकेवर परत नेण्यासाठी प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. थोड्याच वेळात स्मिथने स्वत:ला विमानाच्या बाहेर फेकले (इजेक्ट). ३९० कोटी रुपयांचे हे विमान समुद्रातच क्रॅश झाले. जवळच्या मित्रासोबत झालेल्या दुर्घटनेनंतरही लेफ्ट. स्मेलवूड यांनी आपले उड्डाण पूर्ण केले. या पायलट्सनी आयएसच्या ठिकाणावर ४७०० हून अधिक हल्ले चढवले आहेत. आयएसचा तळ काही ठिकाणी गजबजलेल्या ठिकाणी असतो. त्या वेळी हे पायलट शॉर्प टार्गेट फायर करतात. आयएसच्या दहशतवाद्यांकडे मोर्टार लाँचर, मिसाइल लाँचर, मिसाइल्स आणि मॅनपॅड्स आहेत; परंतु त्यांची क्षमता अमेरिकी विमान पाडण्याइतकी नाही. आयएसच्या विरोधात टार्गेट हेच मुख्य आव्हान असते.

नेव्हीमध्ये 'यांना यार्ड' सेल या सांकेतिक नावाने ओळखले जाते
माझे वडील नेव्हीमध्ये पायलट होते. मी उड्डाणाच्याच क्षेत्रात लहानाचा मोठा झालो. ६ वर्षांचा असल्यापासून वडिलांनी मला एका एअर शोमध्ये नेले होते. त्यानंतर मला असे वाटू लागले की माझा जन्मच मुळी फायटर पायलट होण्यासाठी झाला आहे.
©The New York Times
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण काय म्हणतो...