आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वाधिक घनदाट वस्‍ती आहे या बेटावर, फोटोंमध्‍ये दिसतो असा View

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेटांवर पर्यटक फिरण्‍यसासाठी जात असतात. मात्र जगात असे एक बेट आहे ज्‍यावर आता घनदाट वस्‍ती निर्माण झाली आहे. या बेटावर अक्षरश: इतकी दाटीवाटी झाली आहे की, एक इंच जागेवरही बांधकाम करण्‍यासाठी येथे जागा नाही. इतकेच नव्‍हे तर या बेटावरीलच नागरिक आता राहण्‍यासाठी दुस-या बेटाचा शोध घेत आहे. 

या देशात आहे हे बेट 
पनामा देशात हे बेट आहे. याचे नाव सान ब्‍लास असे आहे. वरील एरीअल फोटो याच बेटाचा आहे. येथे गुना नावाच्‍या जमातीचे लोक राहतात. या वस्‍तीवर शेती किंवा झाडांसाठी तर सोडाच आता माणसांनाही राहण्‍यासाठी जागा पुरत नाहीए. याच कारणामुळे येथील लोक नारळ आणि अन्‍य प्रकारच्‍या शेतीसाठी इतर बेटांवर जात आहे. मात्र तेथीलही नैसर्गिक साधनसंपत्‍ती आता धोक्‍यात येत आहे. 

हा फोटो करीम इलिया यांनी काढलेला आहे. नॅच्‍युरल फोटोग्राफर स्‍पर्धेत या फोटोचाही समावेश होता. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, सन ब्‍लास बेटांवरील इतर टापूंचे फोटोज... 
 
 
बातम्या आणखी आहेत...