आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेकून दिलेला धातूचा तुकडा अचानक चमकला, मग कळाले हा तर प्राचीन खजिना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - लंडनच्या क्रिस कटलरने एका शेतात 1500 वर्षांपूर्वीचा खजिना शोधून काढला आहे. कटलरने स्वतः 4 दिवस 17 हजार चौरस फुटांचे शेत मेटल डिटेक्टरने चाळून हा खजिना शोधून काढला आहे. सापडलेल्या खजिन्यात सोन्याच्या नाणी आहेत. ज्या हजारो वर्षे प्राचीन अँग्लो सॅक्सन राजाने पुरल्या होत्या. कटलरला ज्या नाणी सापडल्या आहेत त्या एकेकाळी अतिशय प्रतिष्ठित होत्या. अशा प्रकारच्या नाणी राजा किंवा शाही घराण्याच्या सदस्यांच्या मृत्यूनंतर ताबूतसह पुरल्या जात होत्या. या खजिन्याची किंमत जवळपास 1 कोटींच्या घरात आखली जात आहे.

 

असा सापडला खजिना...
> लंडनमध्ये राहणाऱ्या 54 वर्षीय क्रिस कटलरने प्राचीन खजिन्याचा शोध घेण्यासाठी ऐतिहासिक घटनांचे स्थळ शोधून काढले. कित्येक महिन्यांच्या अभ्यासानंतर त्याने विविध फील्डमध्ये मेटल डिटेक्टरने शोध घेतला.
> यानंतर एसेक्स येथील 17 हजार चौरस फुटांच्या शेतात खजिना असू शकतो असा अंदाज त्याने लावला. सलग 4 दिवस तो शेतात न थकता मेटल डिटेक्टरने खजिन्याचा शोध घेत होता. अखेर चौथ्याच दिवशी त्याला आपल्या मेटल डिटेक्टरवर धातूचा संकेत मिळाला. 
> खोदून पाहिल्यानंतर काही धातूचे तुकडे त्याच्या हाती लागले. त्याने निराश होऊन तो तुकडा तसाच त्या ठिकाणी फेकून दिला. पण, फेकत असतानाच जमीनीला घासून त्या धातूच्या तुकड्याचा कोपरा पिवळा झाल्याचे त्याला दिसून आले. लगेच धूळ पुसून पाहिल्यास ते सोन्याचे नाणे असल्याचे त्याच्या लक्षात आले.
> आपल्या शोध कार्याला यश आल्याने उत्साही झालेल्या कटलरने त्या ठिकाणी आणखी खोदकाम केले असता तशाच प्रकारचे 25 कॉइन त्याला सापडले आहेत. 
> आपल्या हातातील कॉइन अँग्लो सॅक्सन असल्याची त्याला माहिती होती. कारण, 18 महिन्यांपूर्वीच त्याने अँग्लो सॅक्सन खजिना शोधून काढला होता. तो गेल्या 25 वर्षांपासून फक्त खजिना शोधून आपला उदरनिर्वाह करतो.


काय झाले त्या खजिन्याचे
ब्रिटनच्या कायद्यानुसार, सापडलेल्या वस्तू 300 वर्षे जुन्या आणि त्यातील 10 टक्के वस्तू सोन्याच्या असल्यास त्यालाच खजिना असे संबोधले जाते. सध्या हा खजिना ब्रिटनच्या हिस्ट्री म्युझियमला पाठवण्यात आला आहे. पुरातत्ववेदता त्याचा सविस्तर तपास करून अंतिम किंमत आणि त्यानंतर रक्कम वाटण्याचा निर्णय घेणार आहेत. त्याने 18 महिन्यांपूर्वी शोधून काढलेला खजिना सुद्धा म्युझियममध्ये विचाराधीन आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या खजिन्याचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...