आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Man Literally Gives Half Of His Property To His Wife After Divorce

Video : आजवर तुम्ही पाहिले नसेल कोर्टाच्या आदेशाचे एवढे तंतोतंत पालन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळामध्ये घटस्फोट ही तशी फारशी आश्चर्यकारक गोष्ट राहिलेली नाही. त्यातच विदेशांमध्ये तर लग्न मोडण्याचे असलेले प्रमाण पाहता घटस्फोट हा विवाहसंस्थेतीलच एक भाग आहे असे वाटण्याइतपत गंभीर स्थिती आहे. पण घटस्फोटातील सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे नाते तुटल्यानंतर पती पत्नीमध्ये संपत्तीवरून होणारे वाद. जर्मनीमध्येही एक असाच वाद कोर्टापर्यंत पोहोचला. कोर्टाने या व्यक्तीला पत्नीला संपत्तीचा अर्धा हिस्सा देण्याचा आदेश दिला. मग काय त्या अवलियानेही कोर्टाच्या आदेशाचे शब्दशः पालन केले. त्याने अक्षरशः पॉवर टूलने सर्व वस्तूंचे दोन दोन तुकडे केले आणि पत्नीला तिचा अर्धा हिस्सा दिला.

जर्मनीमधील या व्यक्तीचे नाव देर जुली असे आहे. या घटस्फोट प्रकरणामुळे देर एवढा संतापलेला होता की, त्याने स्वतः त्याच्या हाताने सर्व वस्तुंचे दोन तुकडे करून पत्नीला दिले. या प्रकाराचा व्हिडीओदेखिल त्याने तयार केला. टिव्ही, पलंग, सोफा एवढंच काय पण त्याने आय फोनचेही बरोबर दोन तुकडे केले आणि पत्नीला दिले. त्याच्या पत्नीचे नाव लॉरा असे आहे. यूट्यूबवर अपलोड केलेल्या या व्हिडीओच्या डीस्क्रीप्शनमध्ये त्याने लिहिले, लॉरा 12 वर्षांच्या आनंदी जीवनासाठी धन्यवाद. यात तुझा अर्धा वाटा नक्कीच आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. विशेष म्हणजे देर याने त्याच्या अर्ध्या कापलेल्या वस्तू एका वेबसाईटवर विकायलाही काढल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, देरच्या वाट्याला आलेल्या वस्तू...
अखेरच्या स्लाइडवर पाहा, वस्तुंची वाटणी करण्याचा अनोखा VIDEO...