आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जणू पॉप स्टार \'बियोन्स\'ची जुळी बहीणच, Selfie साठी लोक करतात गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या मिशीगन प्रांतात राहणारी ब्रिटनी विल्यम्स जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा रस्त्यावरील सगळेच तिला एक टक लावून पाहतात. काही लोक तिच्या जवळ येऊन सेल्फी काढण्याचा आग्रह करतात. लोकांना ती हुबेहूब पॉप स्टार बियोन्स सारखी दिसते. पॉप स्टार बियोन्स आपल्या भागात आल्याचे समजून लोक तिच्या भोवती गर्दी करतात. बियोन्सची कॉपी असल्याने तिच्याकडे मॉडेलिंगच्या प्रचंड ऑफर्स आहेत. ब्रिटनी आपल्या लुकमुळे सोशल मीडियावर स्टार आहे. तिचे इंस्टाग्रामवर 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

 

ब्रिटनी विल्यम्स सांगते, की तिने कधीही बियोन्सची नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही तरीही लोक तिला पॉप स्टार समजतात. काही लोक तर आपल्या मागे लागतात. तर काही विनापरवानगी फोटोज काढून ते सोशल मीडियावर पॉप स्टारच्या नावाने पोस्ट करतात असे अनुभव देखील तिने मांडले आहेत. आपण कधीही कुणाची कॉपी करत नाही, फक्त ग्लॅमरस राहण्याचा प्रयत्न करतो असे ती वारंवार सांगते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटनी विल्यम्सचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...