आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साडे 3 फुटांच्या मॉडेलने Instagram वर लावलीये आग, जाळ अन् धूर संगटच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - मॉडेल होण्यासाठी उंची किंवा सौंदर्यापेक्षा आत्मविश्वास सर्वात आवश्यक आहे. उंचीवरून लोकांचे टोमणे ऐकूण-ऐकूण मोठी झालेली ड्रू प्रेस्ट्रा मॉडेल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श ठरत आहे. तिची उंची फक्त 3.4 आहे. पण, तिचा आत्मविश्वास तुमच्या-आमच्या आणि कुणाच्याही हाइटपेक्षा किती तरी पटीने उंच आहे. ड्रूने सर्वप्रथम जेव्हा मॉडेलिंग होणार असल्याचे सांगितले तेव्हा तिच्या मित्र-मैत्रिणींनीच नव्हे, कुटुंबियांनी देखील थट्टा उडवली. याच कारणामुळे तिने आपले घर सोडले. अमेरिकेतील नेवाडा सोडून लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झालेली ही 21 वर्षीय तरुणी आता प्रोफेशनल मॉडेल आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. तिने टाकलेल्या एका यूट्युब व्हिडिओला तब्बल 3 लाख व्यू आहेत. 

 

पुढे पाहा, गगनाएवढा आत्मविश्वास असलेल्या या आदर्श मॉडेलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...