आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कधी बघितले आहेत ब्लॅक टोमॅटो, कॅन्सरवर आहेत प्रभावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी बघितले आहेत ब्लॅक टोमॅटो, कॅन्सरवर आहेत प्रभावी. - Divya Marathi
कधी बघितले आहेत ब्लॅक टोमॅटो, कॅन्सरवर आहेत प्रभावी.
टोमॅटो म्हटले, की कच्चे असतील तर रंगाने हिरवे आणि पिकल्यावर पिवळे-लाल होतात. ठिकठिकाणी टोमॅटोची चव वेगवेगळी असते. त्यांच्या आकारमानातही बदल दिसून येतो. पण कधी तुम्ही काळे टोमॅटो बघितले आहेत का... का दचकलात... होय, आम्ही काळ्या टोमॅटोंविषयी बोलतोय. यांना नैसर्गिकपणे काळा रंग आहे. चविला ते चविष्ट आहेत, असेही सांगितले जाते. सध्याच ते भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाहीत. पण विदेशातील काही शेतकरी यांचे पिक घेतात. अमेरिकेत पहिल्यांदा ब्लॅक टोमॅटोची शेती करण्यात आल्याचा उल्लेख सापडतो.

ब्लॅक टोमॅटोत सापडणारे अॅन्थोसायनिन नावाचे अॅन्टी ऑक्सिडंट आरोग्याला अतिशय लाभदायी आहे. कॅन्सर, डायबेटीज आणि लठ्ठपणा या आजारांवर अॅन्थोसायनिन प्रभावी आहे. या सुपर-फ्रुटचा केवळ रंगच नाही तर गुणधर्मही आपल्या आरोग्याला पोषक आहेत. सर्वांत आधी अमेरिकेत या टोमॅटोची शेती करण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमधील रे ब्राऊन या व्यक्तीने याचे उत्पादन घेतल्याचे समजते. आता जगातील अनेक भागांमध्ये ब्लॅक टोमॅटोंची शेती केली जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अनोखे ब्लॅक टोमॅटो.... रे ब्राऊन यांचा ब्लॅक टोमॅटोसह फोटो....
बातम्या आणखी आहेत...