आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीच्या बँक खात्यात अचानक आले 30 कोटी, झटक्यात झाली मालामाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - घरी निवांत बसले असताना अचानक मोबाईलवर मेसेज आला की तुमच्या बँक अकाउंटमध्ये काही कोटी रुपये जमा झालेत, तर काय कराल? साहजिक आहे, जागेवरून उठून नाचायला लागाल. मग काही क्षणातच भिती निर्माण होईल. प्रश्न पडेल की हे पैसे कुणी टाकले असावेत. काही जण त्याची चौकशी सुद्ध सुरू करतील. पण, ऑस्ट्रेलियातील या विद्यार्थिनीने असा काहीही विचार करण्यात आपला वेळ वाया घालवला नाही. तिने कुणाला काहीच सांगितले नाही. ती सरळ मॉल, ब्रँडेड शोरूम आणि बाजारात गेली. मग सुरू झाला तिचा शॉपिंग फेस्टिव्हल... यानंतर जेव्हा सत्य तिच्या समोर आले, तेव्हा तिची झोपच उडाली.

 

काय आहे प्रकरण?
> ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात शिकणारी मलेशियन तरुणी क्रिस्टीन ली हिच्या बँक अकाउंटमध्ये 30 कोटी रुपये जमा झाले होते. बँकेच्या चुकीने हा घोळ झाला होता आणि ती एका झटक्यात मालामाल झाली.
> यात महत्वाचे म्हणजे, तिने पैशांची चौकशी करण्याचे कष्टच घेतले नाही. ली कित्येक दिवस फक्त आणि फक्त शॉपिंग करत होती. 
> तिने लाख-लाख रुपयांचे शेकडो ब्रँडेड पर्स, परफ्यूम, महागडे गॉगल आणि दागिन्यांसह विविध वस्तूंचे जणू दुकानच मांडले होते. 
> 2012 मध्ये केलेली ही चूक बँकेला 3 वर्षांनंतर 2015 मध्ये लक्षात आली. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली आणि चौकशी सुरू झाली. तेव्हा ली हिच्या खात्यात जमा झालेले 30 कोटी रुपये खर्च झाले आहेत असे समोर आले. 

 

आता झाली निर्दोष मुक्तता
> 2016 मध्ये पोलिसांनी तिला सिडनी विमानतळावरून अटक केली. तिच्या विरोधात फसवेगिरी करून आर्थिक लाभ घेण्याचा खटला दाखल करण्यात आला. 
> मात्र, कोर्टाने तिची निर्दोष मुक्तता केली आहे. बँकेने काहीही स्पष्टीकरण न देता तिच्या विरोधातील सर्व आरोप मागे घेतले आहेत. एवढेच नव्हे, तर आता तिला खर्च केलेली रक्कम परत करावी सुद्धा लागणार नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, तिने खरेदी केलेली साहित्ये आणि तिचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...