आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शेजारच्या देशात मुस्लिमांवर सुरुय अत्याचार व हिंसा, अशी आहे भयंकर स्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्यानमारमधून बांगलादेशात पळून जाताना रोहिंग्या मुस्लिम... - Divya Marathi
म्यानमारमधून बांगलादेशात पळून जाताना रोहिंग्या मुस्लिम...
इंटरनॅशनल डेस्क- मान्यमारमधील उत्तर-पश्चिम भागात मागील आठवड्यात रोहिंग्य मुस्लिम समुदायातील २६०० घरे जाळली. त्यामुळे भीतीने घाबरून तेथील सुमारे ६० हजार रोहिंग्या मुस्लिम लोक जीव वाचविण्यासाठी शेजारी बांगलादेशात पळाले. मात्र, तेथूनही बांगलादेशाने त्यांना हुसकावून लावले आहे. त्यामुळे त्यांना ना घर राहिले आहे ना कुठे आसरा मिळत आहे. संयुक्त राष्ट्रासाठी काम करणा-या एका संस्थेच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसात म्यानमार लष्कर आणि रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेल्या हिंसेत ४०० रोहिंग्य समुदायाचे लोक मारले गेले आहेत. दुसरीकडे, म्यानमार लष्कराने अराकान रोहिंग्य मुक्ती सेना (एआरएसए) या संघटनेला जबाबदार धरले आहे. कोण आहेत रोहिंग्या...?
 
- रोहिंग्या हे इंडो-आर्यन वंशाचे मानले जातात. म्यानमारच्या रकेन प्रांतातील हे मूळ निवासी आहेत.
- रोहिंग्या ही त्यांची भाषा असून ब्रिटिश शासन काळात ते बांगलादेशातून म्यानमारमध्ये विस्थापित झाल्याचे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे.
- काही लोक १९४८ मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर काही १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी रकेनला स्थायिक झाले.
- म्यानमारमध्ये सध्या ११ लाख रोहिंग्या मुस्लिम आहेत.
- जनरल विन सरकारच्या कार्यकाळात १९८२ मध्ये त्यांना म्यानमारचे नागरिक मानण्यास नकार दिला होता. तेव्हापासून यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा प्रलंबित आहे.
 
लष्करही करतेय रोहिंग्या मुसलमानांची हत्या-
 
- म्यानमारमध्ये लष्करी राजवटीकडून लोकशाहीकडे सत्तासूत्रे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
- तरीही तेथील लष्कर व बहुसंख्य लोक रोहिंग्या मुस्लिमावर हल्ले करतच आहेत.
- मागील काही वर्षातच तेथे हजारो रोहिंग्य मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे.
- खासकरून वर्ष 2012 पासून बुद्धिस्ट व मुस्लिमांमधील तणावामुळे राखिने येथील परिस्थिती संवेदनशील आहे. 
- मानवाधिकार आयोगाने रोहिंग्या अल्पसंख्याकांवर म्यानमारचे लष्कर जुलूम करत असल्याचे म्हटले आहे. 
- त्यांची लूट, बलात्कार, घरांची जाळपोळ लष्कर करत असल्याचा मानवाधिकार आयोगाचा दावा आहे. 
- गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा संघर्ष सातत्याने सुरू आहे.
 
म्यानमार सरकार व लष्कर रोहिग्यांना देशाचे नागरिक मानतच नाही-
 
- म्यानमार सरकार, लष्करासह तेथे राहणा-या बुद्धिस्ट लोक रोहिंग्या मुस्लिमांना देशाचे नागरिकच मानत नाही.
- म्यानमारमधील पश्चिम राखिने राज्यात रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्याक गटाचे प्राबल्य आहे. हा प्रांत बांगलादेश सीमेला लागून आहे.
- म्यानमारमधील अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिम समाजास संपूर्ण नागरिकत्वाचे हक्क प्रदान करावेत असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे. 
- या देशातील सुमारे १३ लाख रोहिंग्या मुस्लिमांना देशांतर्गत राष्ट्रीय कायद्यानुसार नागरिकत्वाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.
- यामुळे हे लोक मूलभूत अधिकारांपासून पण वंचित आहेत.
- या समुदायाचे वर्गीकरण बंगाली असे करण्याचा म्यानमारचा सरकारचा हेतू असून यामुळे रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशमधून आलेले निर्वासित असल्याचे मान्यमार युनोला सांगत आहे. जे चूक आहे.
 
युनोच्या हस्तक्षेपानंतरही म्यानमार सरकार ऐकत नाही-
 
- म्यानमारमध्ये लष्करी राजवटीकडून लोकशाहीकडे सत्तासूत्रे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होती त्या काळातही रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध देशामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटून झालेल्या हिंसाचारामध्ये २८० जण ठार झाले होते.
- या पार्श्वभूमीवर रोहिंग्यांना नागरिकत्व प्रदान करण्यात यावे, असा ठराव राष्ट्रसंघाने पारित केला. 
- रोहिंग्यां समाजाविरुद्ध झालेला हिंसाचार व अन्यायाची मूळ कारणे शोधून काढत म्यान्मार सरकारने त्यांना आरोग्य व शिक्षणासंदर्भातील समान अधिकार प्रदान करावेत, असे युनोने म्यानमारला सांगितले आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
 
भारत सरकारही चिंतेत-
 
- भारतात एक लाखापेक्षा जास्त रोहिंगे मुस्लिम असल्याबद्दल चिंता व्यक्त करत सरकारने जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेशसह काही राज्यांची बैठक घेत रोहिंगे मुस्लिमांच्या मुलतत्त्ववादी कारवाईबाबत चर्चा केली होती. 
- रोहिंगे मुस्लिम भारतातील विशेषत: जम्मू-काश्मीरमधील मुलींशी विवाह करत असल्याची माहिती पुढे आली होती.
- प्राथमिक अंदाजानुसार देशात १ लाख ३० हजार रोहिंगे मुस्लिम आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश (मुख्यत: हैदराबाद), केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर आणि दिल्लीत त्यांचे वास्तव्य आहे. 
- रोहिंग्या मुस्लिमांचा त्यांची मायभूमी म्यानमारमध्ये छळ करण्यात आला. त्यामुळे या समुदायाचे सदस्य मुलतत्त्ववादाला प्रोत्साहन देतील, अशी भीती आहे. 
- परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आपण काळजी घेतली पाहिजे, असे भारत सरकारचे म्हणणे आहे.
 
भारत-बांगलादेश सीमेवरून आपल्या देशात प्रवेश-
 
- रोहिंग्या मुस्लिमांनी भारत-बांगलादेश सीमेवरून देशात प्रवेश केल्याचे मानले जाते. यातील बहुतांश जणांनी निर्वासितांना दिले जाणारे ओळखपत्र प्राप्त केले आहे. 
- त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांच्या छावणीत आश्रय घेतलेल्या या मुस्लिमांची ओळख पटवणे कठीण आहे.
- भारत-बांगलादेश सीमेवर त्रिपुरामार्गे रोहिंग्या मुस्लिमांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती गृह मंत्रालयाला मिळाली होती. एकूणच या घटनेमुळे भारत सरकार आजही चिंतित आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, म्यानमारमध्ये कशी आहे रोहिंग्या मुस्लिमांची वाईट परिस्थिती...
बातम्या आणखी आहेत...