इंटरनॅशनल डेस्क - मुस्लिम बहुल देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडोनेशियात कट्टरपंथियाच्या विरोधामुळे गतवर्षी येथील जगातील पहिले ट्रान्सजेंडर बोर्डिंग स्कूल बंद पडले. अशात हजारो ट्रान्सजेंडर बेघर झाले आहेत. आता हेच कट्टरपंथिय इंडोनेशियातील ब्रॉथेल्स (वेश्यालये) तोडत आहेत. इंडोनेशियात प्रॉस्टिट्यूशनवर महिन्याला 615 कोटी रुपये खर्च केले जातात. वेश्यालये तोडल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर वाइट परिणाम होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. या वेश्यालयांमध्ये 10 पैकी एका मुलीचे वय 17 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे.
- इंडोनेशियात 140,000 ते 230,000 प्रॉस्टिट्यूट्स आहेत. याला लोअर, मिडल, अप्पर आणि एलीट क्लासमध्ये वर्गीकृत केले जाते.
- येथील सेक्स सेक्टरची वार्षिक उलाढाल 8000 कोटी ते 22,000 कोटी रुपयांत आहे. देशाच्या जीडीपीत त्याचा 0.8 ते 2.4 टक्के इतका वाटा आहे.
- एका अहवालानुसार, येथील दहापैकी एका प्रॉस्टिट्यूटचे वय 17 वर्षांपेक्षा कमी आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...