आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराच्या विरोधात हजारो नागरिक ब्राझीलमध्ये रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पनामा सिटी - ब्राझीलमध्ये शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले हाेते. विविध पक्षांतील नेते, उद्योजकांवर लाच घेतल्याचा आरोप असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  
 
देशातील सर्व राजकीय पक्षांत भ्रष्टाचारी नेते आहेत. उद्योगांतही हीच परिस्थिती आहे. लाच घेऊन कामे केली जातात. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील व्यवहार भ्रष्ट बनला आहे. त्यामुळे समाजव्यवस्था पोखरून निघत आहे. अशा भ्रष्ट लोकांकडील पैसा वसूल केला पाहिजे. भ्रष्ट नेते, उद्योजकांना तुरुंगात पाठवा, अशी मागणी नेते सॉल मेंडीझ यांनी केली आहे. आॅडेब्रेश्ट या ब्राझीलच्या कंपनीभोवती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 
 
काय आहे प्रकरण ?  
हा भ्रष्टाचार बांधकाम क्षेत्रातील कंत्राटाबाबतचा आहे. बारा देशांतील बांधकामासाठी कंत्राट प्रक्रियेत हा लाचखोरी झाल्याचा आरोप आहे. सुमारे ७ कोटी ८८ लाख डॉलर्सची ही लाचखोरी असल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला आहे. ऑडेब्रेश्ट कंपनी या वादाच्या केंद्रास्थानी आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने लाचखोरी संबंधीचे आरोप स्वीकारले आहेत. अशाच एका प्रकरणात अमेरिकेच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे कंपनीने सुमारे ३.५ अब्ज डॉलर्सचा दंडही भरल्याचे मान्य केले.  
 
बातम्या आणखी आहेत...