वॉशिंग्टन- अमेरिकेमध्ये सध्या हिमवादळाचा जोरदार कहर सुरू असून, 17 राज्यांच्या जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वादळासह पाऊस होत असल्याने 2000 किलोमीटरच्या क्षेत्रात कडाक्याची थंडी पडली आहे. येथील नद्या गोठल्या आहेत. धुक्यामुळे दृश्यमानताही कमी झालेली आहे.
- हिमवादळामुळे 17 राज्ये बाधित झाले असून, तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- विमानसेवेवरही हिमवादळाचा परिणाम झाला. सुमारे दोन हजार उड्डाणे रद्द करण्यात आली.
- 8500 हून अधिक विमानांची उड्डाण विलंबाने होत आहे.
- 2000 किलोमीटर परिसरात बर्फाची चादर पसरली आहे.
- धुक्यामुळे रस्त्यांवर वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे.
अपघातात 4 जण ठार....
- नॉर्थ कॅरोलिना आणि व्हर्जिनियामध्ये 2000 हून अधिक अपघात झाले आहेत.
- या अपघातांमध्ये आतापर्यंत चार जण ठार झाल्याची माहिती आहे.
- मिसिसिपीमध्ये काही इमारतींनाही नुकसान झाले आहे. बोस्टनमध्ये रेल्वेसेवाही ठप्प झाली.
- न्यू हॅम्पशायरमध्ये रविवारी - 40 ° डिग्री तापमानाची नोंद झाली आहे.
पुढील स्लाइड्सवरील फोटोंमध्ये पाहा, हिमवादळाने असा केला कहर....