आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thousands Of Men Assault Women\'s In A Water Park

वॉटर पार्कमध्ये तरुणींची छेडछाड, विनयभंग; अनेक दिवसांनी फोटो व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएतनाम येथे एका वॉटरपार्कमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेने सध्या खळबळ उडवून दिली आहे. याठिकाणी वॉटरपार्कच्या पूलमध्ये एकाचवेळी अनेक तरुणींची छेडछाड केल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. या घटनेतील अनेक पीडित तरुणी आता आपबीती सांगत आहेत. या घटनेचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

जवळपास तीन महिन्यांपूर्वी व्हिएतनामच्या हनोई येथील हो ते वॉटरपार्कमध्ये अधिक पैसा कमावण्यासाठी म्हणून दोन तास मोफत प्रवेश देण्याची योजना घोषित करण्यात आली होती. 19 एप्रिल रोजी अशा प्रकारे मोफत प्रवेश देण्यात येणार होता. या ऑफरच्या सुमारे तासभरानंतर हजारो लोक याठिकाणी येऊ लागले. त्यामुळे वॉटरपार्कमधील गर्दी वाढली. लोकांनी मोठ्या संख्येने पूलमध्ये उतरण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पुलमध्ये उतरलेल्या 70 ते 80 तरुणांच्या एका गटाने मुलींची छेडछाड करण्यास सुरुवात केली. मुलींच्या अंगावर पाणी उडवणे, गोंधळ घालणे त्यांना आत ओढणे असे प्रकार याठिकाणी सुरू करण्यात आले होते.
तरुणी पाहिली की ते एकच हल्ला करायला सुरुवात करायचे. त्यामुळे अनेक मुलींना त्याचठिकाणी रडूही कोसळत होते. विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या सुमारे 20 मुलींना एकाच वेळा शेकडो लोक त्रास देत होते. मुलांनी काही मुलींचे कपडेही ओढून काढले व त्यांना पूर्णपणे नग्नही केले होते. काही मुली पळून जाण्यासाठी गेटवर चढून बाहेर गेल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि व्हिडिओ...