आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 किलोमीटरपर्यत पसरली ज्वालामुखीची राख, लोकांनी सोडले गाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमात्रा बेटावरील चर्चच्या आसपास पसरलेली राख - Divya Marathi
सुमात्रा बेटावरील चर्चच्या आसपास पसरलेली राख
सुमात्रा - इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील मॉऊंट सिनाबंग ज्वालामुखीतून सतत गरम राख आणि धुळ बाहेर निघत आहे. यामुळे जवळच्या गावातून जवळ-जवळ 10 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्‍यात आले आहे. मॉऊंट सिनाबंग गेले दोन आठवड्यांपासून जागृत झाला आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख 15 किलोमीटरपर्यंत पसरली आहे, असे आपत्ती निवारणाच्या अधिका-यांनी सांगितले. आतापर्यंत 10 हजार 714 लोकांना विस्थापित करण्‍यात आले आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सतत राख आणि धूर निघत आहे. व्हॉल्कनो ऑब्झर्व्हेशन पोस्टच्या प्रमुखानुसार, सध्‍या तरी दिलासा मिळणार नसल्याचे अंदाज आहे.

ज्वालामुखीतून बाहेर पडणा-या राखेने 15 किलोमीटरामधील घरांना आपल्या कार्यक्षेत्रात घेतले होते. सर्व सामान्य स्थिती येण्‍यास एक आठवडापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. मात्र येथे राहणे जीवास धोकादायक आहे.
400 वर्षापेक्षा निद्रिस्त असलेला 2 हजार 460 मीटर उंचीचे मॉऊंट सिनाबंग 2010 पासून जागृत झाला. 2014 मधील उद्रेकात 17 हजार लोक मारली गेली. 2013 मध्‍ये ज्वालामुखी सक्रिय झाल्याने आसपासच्या गावातून 10 हजार लोकांनी आपले घर सोडले होते. यातील काही जण घर परतले. परंतु 6 हजारापेक्षा जास्त लोक आजही निर्वासित जागेत राहत आहे. ज्वालामुखी उद्रेकाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुमात्रात ज्वालामुखी उद्रेकानंतरची परिस्थिती...