आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानटी डुकराची शिकार करून खाल्ले मांस, अख्खे कुटुंब कोमात; यामुळे वाचल्या मुली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाचे एक अख्खे कुटुंब मृत्यूशी झुंज देत आहे. 35 वर्षीय शिभू त्याची पत्नी आणि आई सगळेच सध्या कोमात आहेत. शिभूच्या दोन मुली सुखरूप आहेत. या कुटुंबियांनी नुकतीच एका जंगली डुकराची शिकार केली होती. त्याच डुकराचे मांस खालल्यानंतर कुटुंबाची ही अवस्था झाली आहे. 

 

यामुळे वाचल्या मुली...
> मूळचा केरळचा असलेला 35 वर्षीय शिभू 5 वर्षांपूर्वी आपल्या आई, पत्नी आणि 2 वर्षीय मुलीसह न्यूझीलंडमध्ये नोकरीसाठी गेला. तेव्हापासून हे कुटुंब तेथेच राहते. शिभूला यानंतर आणखी एक मुलगी झाली, ती आता 2 वर्षांची आहे. 
> न्यूझीलंडच्या पुतारुरु सिटीमध्ये राहणारा शिभू कोचुम्मेन एका खासगी कंपनी काम करतो. गेल्या मंगळवारी शिभू आपल्या पत्नी, आई आणि दोन मुलींसह शिकारीसाठी सहलीला गेला. 
> त्यांनी जंगलात जाऊन रानटी डुकराची शिकार केली आणि त्याचे मांस तेथेच लाकडांवर भाजून खाल्ले. काही मिनिटांतच पती, पत्नी आणि आईची तब्येत बिघडली. बेशुद्ध अवस्थेत त्या तिघांनाही रुग्णवाहिकेत रुगणालयात दाखल करण्यात आले. 
> तिघे रुगणालयात पोहोचले तेव्हा ते कोमात गेले होते. येथील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 
> कोचुम्मेनच्या 7 वर्षीय मुलीने सांगितल्याप्रमाणे, ती आणि तिची बहिण झोपेत होते. त्यामुळे, त्या दोघींनी डुकराचे मांस खाल्ले नाही. वैद्यकीय अहवालानुसार, त्यांनी ज्या डुकराचे मांस खाल्ले ते विषारी होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कुटुंबियांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...