आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Quarter Berths Sold Out In Seven Seas Navigator Cruise

रूमचे भाडे 2 कोटी, तरी पहिल्याच दिवशी 70% बर्थ बूक, पाहा आलिशान Cruise

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेव्हन सीज नेव्हीगेटर क्रूज. - Divya Marathi
सेव्हन सीज नेव्हीगेटर क्रूज.
सेव्हन सीज नेव्हीगेटर क्रूज शिपचे सुमारे 70 टक्के बर्थ पहिल्या दिवशीच बूक झाले आहेत. विशेष म्हणजे या क्रूज शिपमधील सर्वात स्वस्त रूमसाठी सुमारे 35 लाख रुपये भाडे आहे. तर सर्वात लक्झरी रूमसाठी 2 कोटी रुपये खर्च करावे लागतील. ही शिप 6 खंड, 31 देश आणि 60 पेक्षा अधिक पोर्टचा प्रवास करणार आहे.
या प्रवासात भेट दिल्या जाणाऱ्या स्थळांपैकी 29 स्थळे ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी आहेत. नॉर्वेयन क्रूज लाइन होल्डिंग्सचे सीईओ फ्रँक डेल रियो यांनी सांगितले की, सुमारे तीन-चतुर्थांश बर्थ पहिल्याच दिवशी म्हणजे, 15 जुलैलाच बूक झाले होते. ही क्रूज चालवणारी रीजेंट सेव्हन सीज हीदेखिल नॉर्वेयन क्रूज लाइन होल्डिंग्सचीच कंपनी आहे.
रियो म्हणाले, बर्थच्या बुकींगवरूनच या क्रूजची लोकप्रियता सिद्ध झाली आहे. हा केवळ आमच्या ब्रँडबाबतच्या आकर्षणाचा पुरावा नाही तर, क्रूजवर येणाऱ्या पाहुण्यांना काही खास आणि वैविध्यपूर्ण स्थळांच्या प्रवासाचा अनुभव हवा असल्याचे यावरून दिसते. या क्रूजच्या रूमचे भाडे जास्त असले तरी, या पैशाच्या मोबदल्यात आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा देतो. अनलिमिटेड शँपेनपासून ते प्रवासाच्या सुरुवातीला आणि अखेरीस मियामीपर्यंतचा बिझनेस क्लास विमान प्रवासाचा सर्व खर्च यात समाविष्ट असतो.

या क्रूजवर प्रवासाची सुरुवात जानेवारी 2017 मध्ये मियामीमधून होणार असून मियामीमध्येच हा प्रवास संपणार आहे. या क्रूजच्या प्रवासापूर्वी पाहुण्यांना एक रात्र ऐतिहासिक बिल्मोर हॉटेलमध्ये थांबवले जाणार आहे. 490 प्रवाशांसह ही क्रूज कोलंबिया, हवाई, फ्रेंच पोलिनेसिया, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड, भारत, इस्रायल, इजिप्त आणि युरोपमार्गे पुन्हा मियामीला पोहोचेल. सर्व पर्यटक 128 रात्रींसाठी या आलिशान क्रूझमध्ये असतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या सेव्हन सीज नेव्हीगेटर क्रूज शिपचे PHOTOS...