आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईएस 2017 : तीन स्क्रीनचा लॅपटॉप, क्रेडिट कार्डसारखा कॉम्प्युटर, ४२ पॉकेट्सचे जॅकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिअर व्हीआर थिएटर - Divya Marathi
गिअर व्हीआर थिएटर
लास वेगास- अमेरिकेच्या लास वेगासमध्ये सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये(सीईएस- २०१७) अनोख्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये स्पर्धा सुरू आहे. यात तीन स्क्रीनचा लॅपटॉप, क्रेडिट कार्डसारखे कॉम्प्युटर आणि ४२ पॉकेटचे जॅकेट ही उत्पादने लक्ष  वेधून घेतात. यासोबत विशेषत: कारमध्ये व्हर्च्युअल असिस्टंटवरही भर आहे. कारमध्ये बसून घरातील कामे व्हावीत तसेच घरातून कार नियंत्रित व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. व्हर्च्युअल असिस्टंटद्वारे कारमधून घरातील व घरातून कारचा एसी चालू होईल. दरवाजे लॉक होतील. प्रवासात भूक लागल्यास रेस्तराँची माहिती मिळून टेबल बुक होईल. ऑटो कंपन्या निसान, बीएमडब्ल्यू, फोर्ड आणि ह्युंदाईने त्यासाठी मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन आणि गुगलशी करार केला आहे.  

थ्रीडीचा नाही, फाेरडीचा आनंद घ्या : सॅमसंगने ‘गिअर व्हीआर थिएटर’ सादर केले आहे. हे युजरला ३६० अंशातील व्हिडिओ म्हणजे फोरडीचा अनुभव देईल. त्यासाठी त्यात अनेक हेडसेट व मोशन प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.
 
पुढिल स्लाइडवर पहा...
- तीन स्क्रीनचा लॅपटॉप
- ४२ पॉकेटचे जॅकेट 
- ५ मिमी मोठा कॉम्प्युटर, वायफाय व ब्ल्यूटूथही
बातम्या आणखी आहेत...