आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाच्‍या प्रेयसीला मुलांनीच केले प्रपोज, तू आमची आई होशील का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्‍लीवलँडमध्‍ये 3 मुलांनी आपल्‍या वडीलांच्‍या प्रेयसीला अशी काही भेट दिली की, ते पाहून ती अतिशय भावूक झाली. या तिन्‍ही चिमुकल्‍यांनी तिला अगोदर सोफ्यावर बसायला सांगितले. नंतर तिच्‍याकडे गिफ्ट बॉक्‍स दिले. ते उघडून पाहताच प्रेयसीचे डोळे पाणावले.
 
काय होते बॉक्‍समध्‍ये
- मुलांनी जेव्‍हा प्रेयसीला सोफ्यावर बसायला सांगितले व तिच्‍याकडे बॉक्‍स दिला तेव्‍हा सुरुवातीला ती घाबरली. तुम्‍ही माझ्यासोबत काही ट्रीक तर करत नाहीना, असे तिने मुलांना विचारले.
- नंतर बॉक्‍स ओपन करत असतानाच या तिन्‍ही मुलांनी गुडघ्‍यावर बसत तिला सांगितले की, 'आम्‍ही तुम्‍हाला आमचे वडील देत आहोत. तुम्‍ही आमच्‍या आई व्‍हाल का?' हे ऐकताच त्‍या अतिशय भावूक झाल्‍या.
- बॉक्‍स ओपन करुन पाहिल्‍यावर त्‍यात त्‍यांना वेडिंग रिंग दिसली.
- स्‍टीव्‍ह ली, असे या मुलांच्‍या वडीलांचे नाव आहे. आपल्‍या मुलांद्वारे त्‍यांनी प्रेयसीला अशा अनोख्‍या पद्धतीने प्रपोज केले.
- या प्रपोजलनंतर स्‍टीव्‍हने थेरेसांना विचारले, 'काय तु आम्‍हा चौघांच्‍या आयुष्‍यात येऊ इच्छिते?' यावर भावुक थेरेसाने आनंदाने या प्रपोझलचा स्‍वीकार केला.
-रिपोर्ट्सनूसार, या तिन्‍ही मुलांना आई नसून ते आपल्‍या वडीलांसोबत राहतात.

पुढील स्‍लाइडवर फोटोंद्वारे जाणुन घ्‍या, कसे घडले हे सर्व.....   
बातम्या आणखी आहेत...