आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षांच्या मुलीचे तीन वेळा हृदय प्रत्यारोपण अयशस्वी, कृत्रिम हृदयाने आयुष्यभर काम करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- १३ वर्षाच्या श्योले नारबोनची स्पंदने कृत्रिम हृदयाने धडधड करत आहेत. तिच्यावर ९ तास चाललेल्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल ३० डॉक्टर सहभागी झाले हेाते. एवढ्या कमी वयात कृत्रिम हृदय बसवलेली श्योले जगातील तिसरी व युरोपची पहिली व्यक्ती ठरली आहे. याआधी ज्या मुलांवर अशी शस्त्रक्रिया करण्यात आली  त्यंाची वये ९ आणि ११ वर्षे होती. ती हयात असेपर्यंत हृदय चालू राहील,असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.

वारसेस्टरची रहिवासी श्योलेचे याआधी तीनवेळा प्रत्यारोपण झाले. पहिल्या शस्त्रक्रियेवेळी ती केवळ ४ आठवड्यांची होती. दुसऱ्यांदा ११ वर्षांची . हृदय दात्याच्या प्रतीक्षेत असताना तिला तिसऱ्यांदा स्ट्रोक आला. मात्र, हे प्रत्यारोपणही अयशस्वी ठरले. यानंतर श्योलेच्या जगण्याच्या आशा मावळल्या होत्या. तिच्यासाठी कृत्रिम हृदय हाच एकमेव पर्याय आहे.यातून ती कदाचित वाचू शकेल, असे डॉक्टरांनी सांगितले. 

रॉयल ब्रोम्पटन आणि हॅरीफिल्ड हॉस्पिटलचे संचालक आन्द्रे सिमन म्हणाले, टीममध्ये सहभागी डॉक्टर पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करत होते. या शस्त्रक्रियेत मोठी जोखीम असल्याचे त्यांचे म्हणणे होते. श्योलेला शस्त्रक्रियेदरम्यान एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. शस्त्रक्रियेसाठी तिला तयार केले आणि जीवनरक्षक प्रणाली लावल्याचे जगातील असे हे पहिले उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वी प्रत्यारोपणावेळी आर्टियम आणि अपर चेंबर काढून टाकल्यामुळे सिमनने ते पुन्हा तयार केले. श्योलेची आई फॅबिएन नारबोन म्हणाल्या, डॉक्टरांनी मुलीचे प्राण वाचवणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. 

माझ्या आयुष्यात हृदयाचा त्रास होणार नाही अशी मी आशा करते
श्योले म्हणाली, याआधी माझ्यासोबत काहीच चांगले घडले नव्हते. कृत्रिम हृदयाने मला नवे आयुष्य दिले आहे. माझ्या आयुष्यात हृदयाची कोणतीच अडचण येणार नाही,अशी मी आशा करते. जगात आतापर्यंत १६९० व्यक्तींना कृत्रिम हृदये लावली आहे. त्यातील १८ पेक्षा कमी वय असलेल्यांची संख्या ३४ आहे.
बातम्या आणखी आहेत...