आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ticino Voted In Favour Of A Ban On Face Veils In Public Areas

स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी, बुरखा वापरल्‍यास साडेसहा लाख दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्न- स्वीत्झर्लंड सरकारने देशात महिलांना बुरखा परिधान करण्यास बंदी घातली आहे. ही बंदी प्रामुख्याने टिचिनो भागात असून सार्वजनिक ठिकाणी एखादी महिला बुरखा परिधान करून आढळली तर तिला यासाठी साडेसहा लाख रुपये दंड भरावा लागेल. सार्वमताच्या निकालाआधारे ही बंदी घालण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

या देशात २०१३ मध्ये बुरखा परिधान करण्याबाबत सार्वमत आजमावण्यात आले होते. यात महिलांनी बुरखा घालावा किंवा नाही याबाबत जनतेचे मत मागवण्यात आले हेाते. यात तीनपैकी दोन व्यक्तींनी विरोधात मतदान केले.दक्षिण स्वीत्झर्लंडमधील टिचिनो भागात महिलांसाठीही बंदी लागू करण्यात आली असूनया कायद्याचे उल्लंघन केले तर ६५०० पौंड दंड आकारला जाणार आहे. जगभरात सध्या वाढत चाललेल्या दहशतवादी हल्ल्याचा धोका पाहता हा कायदा करण्यात आला आहे. टिचिनो संसदेने या कायद्याला मंजुरी दिली आहे. स्वीत्झर्लंडमधील माध्यमांनुसार, मुस्लिम महिलांना पूर्ण चेहरा झाकण्यास बंदी असेल. या भागात सार्वजिनक ठिकाणी, विशेषत: मोठे मॉल्स, रेस्तराँ, सरकारी इमारती व कारमध्ये बुरखा घालता येणार नाही. विशेष म्हणजे या देशात येणाऱ्या पर्यटकांसाठी पण हा कायदा लागू करण्यात आला आहे.

दक्षतेचे उपाय : पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा धोका अशात वाढत चालल्यानंतर या भागातील अनेक देशांनी दक्षता घेण्याच्या दृष्टीने कायदे कडक करण्यास प्रारंभ केला आहे. विशेषत: पॅरिसमधील हल्ल्यानंतर तर या देशांमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.