आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मॉर्केल टाइम मासिकाच्या \'Person of the Year\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क : टाइम मासिकाने जर्मनीच्या चान्सलर अँजेला मॉर्केल यांची 2015 च्या 'पर्सन ऑफ द ईयर' म्हणून निवड केली आहे. आश्‍चर्य म्हणजे ISIS चा प्रमुख बगदादी या यादीत दुस-या क्रमांकावर होता. मॉर्केलला निर्वासित संकटाच्या काळात खुलेपणाने पाठिंबा दिल्याने हा गौरव करण्‍यात आल्याचे टाइम मासिकाने सांगितले आहे.
मॉर्केल यांच्या पुढे होते मोदी, तरी संपादकांनी काढले बाहेर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपादकांनी टॉप-8 मध्‍ये स्थान दिले नव्हते. वाचकांच्या मतदानात त्यांना 2.7 टक्के मते मिळाली होती. मॉर्केल त्यांच्यापेक्षा 2.4 टक्के मतांसह 10 व्या स्थानी होत्या. मात्र टाइमच्या संपादकांनी मॉर्केल यांनाच टॉप-8 मध्‍ये निवडले.
29 वर्षानंतर एक महिला झाली पर्सन ऑफ द ईयर :
अँजेला मॉर्केलपूर्वी 1986 मध्‍ये फिलीपीन्सच्या पहिल्या महिला राष्‍ट्रपती कोराझन अॅक्विनो यांना टाइम पर्सन ऑफ द ईयर म्हणून निवड केली होती.
टाइमच्या यादीत यांचेही नाव होते;
> अमेरिकेच अध्‍यक्ष बराक ओबामा
> फ्रान्सचे राष्‍ट्रपती फ्रास्वा ओलांद
> चीनचे राष्‍ट्रपती शी जिनपिंग
> अमेरिकेचे माजी परराष्‍ट्र मंत्री हिलरी क्लिंटन
> पंतप्रधान नरेंद्र मोदी
> पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई
> इलेक्ट्रॉनिक कार निर्मिती कंपनी टेस्लाचे प्रमुख अॅलन मुश्‍क
> अॅपलचे सीईओ टिम कुक
> पोप फ्रान्सिस
> फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग
> आयएसआयएसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी