आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल TIME Person of the Year, ISIS चा बगदादी रनर-अप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनी चॅन्सलेर अँजेला मर्केल - Divya Marathi
जर्मनी चॅन्सलेर अँजेला मर्केल
न्यूयॉर्क - टाइम नियतकालिकाने जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना ‘पर्सन ऑफ इयर’ निवडले आहे. २९ वर्षांनी प्रथमच एखाद्या महिलेची यासाठी निवड झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ISIS चा म्होरक्या अबू बकर अल बगदादी यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. टाइमने मर्केल यांनी सीरियाच्या रिफ्यूजी क्रायसेस दरम्यान उघड-उघड सपोर्ट केल्याबद्दल त्यांची निवड केल्याचे म्हटले आहे.

मर्केलच्या पुढे होते मोदी, तरीही संपादकमंडळाने टाकले बाहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपादक मंडळाने टॉप-8 मध्ये सहभागी केले नाही. रीडर्स पोलमध्ये त्यांना 2.7 टक्के मते मिळाली होती. मर्केल 2.4 टक्के मते मिळवत त्यांच्या मागे (10 व्या क्रमांकावर) होत्या. मात्र संपादक मंडळाने मर्केल यांना टॉप-8 मध्ये जागा दिली.
जर्मनीत चान्सलर पदाचे महत्त्व
जर्मनीत चॅन्सेलर पद म्हणजे सरकारचा प्रमुख असतो. तेथील चान्सलरला सर्व प्रकारची धोरणे ठरविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा अधिकार असतो. ते कॅबिनेटचे सदस्य असतात. जर्मनीच्या चान्सलर पद भारताच्या पंतप्रधान पदाएवढेच महत्त्वाचे मानले जाते.

यादीत कोणा-कोणाचा समावेश
जर्मनी चॅन्सलेर मर्केल यांच्या पाठोपाठ या यादीत कुख्यात दहशतवादी संघटना ISIS चा म्होरक्या बगदादी आहे. याशिवाय टाइमच्या पर्सन ऑफ द इयर यादीत अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, आफ्रिकन-अमेरिकन लोकांसोबत असामनतेच्या वागणुकीविरोधात आवाज उठवणारे 'ब्लॅक लाइव्स मॅटर'चे कार्यकर्ते आणि इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय टॉप-8 मध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, एलजीबीटी अॅक्टिव्हिस्ट केटलिन जेनर, कॅब कंपनी उबेरचे सीईओ ट्रॅव्हिस कालनिक यांचा समावेश आहे.

बगदादी कसा ठरला रनर-अप ?
नियतकालिकाने अबू बकर अल बगदादीविषयी लिहिले आहे, 'आयएसआयएस प्रमुख म्हणून त्याने आपल्या समर्थकांना इस्लामिक स्टेट (इराक आणि सीरिया) मध्ये लढण्यास आणि ट्युनिशिया व फ्रान्ससारख्या देशांमध्ये हल्ला करण्यास प्रेरित केले आहे.'

29 वर्षांनी प्रथमच महिलेची निवड
- अँजेला मर्केल यांच्याआधी 1986 मध्ये फिलीपिन्सच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोराजन एक्विनो यांना टाइम पर्सन ऑफ द इयर निवडण्यात आले होते.
- एक्विनो यांच्याआधी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ-2 (1952) आणि विंडसरची राजकुमारी व्हॅलिज सिम्प्सन (1936) यांची पर्सन ऑफ द इयर निवड झाली होती.

पर्सन ऑफ द इयरच्या शर्यतीत हे देखिल होते
* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
* फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्‍वा ओलांद
* चीनचे राष्‍ट्रपती शी जिनपिंग
* अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन
* पाकिस्तानची नोबेल अवॉर्ड विजेती मलाला यूसुफजाई
* इलेक्‍ट्रॉनिक कार तयार करणाऱ्या टेस्ला कंपनीचे प्रमुख अॅलॉन मुश्‍क
* अॅपलचे सीईओ टिम कुक
* पोप फ्रांसिस
* फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग

काय होता शरणार्थींचा प्रश्न
- सीरिया आणि लिबिया सारख्या देशांमध्ये गेल्या चार वर्षांपासून सिव्हिल वॉर सुरु आहे.
- येथे आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी नागरिकांचे जगणे कठिण करुन टाकले आहे.
- याशिवाय अफगाणिस्तान, इराक आणि नायझेरियामधूनही गरीबी आणि हिंसेचा पाठलाग सोडवण्यासाठी लोक यूरोपाच्या दिशेने जात होते.
- या वर्षी ग्रीसच्या सीमेवरुन सर्वाधिक शरणार्थी आले आहेत. यात जास्तित जास्त सीरियाचे होते, हे लोक तुर्कीपर्यंत बोटीने येत होते.
- छोट्या-छोट्या बोटीत बसून ट्यूनिशिया किंवा लिबियामधून इटलीला पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहातो.

जर्मनीचे योगदान
- जर्मनीने या वर्षी जवळपास 10 लाख लोकांना आश्रय दिला. कोणत्याही यूरोपीय देशांपेक्षा ही संख्या जास्त आहे.
- शरणार्थींमध्ये जर्मनी लोकप्रिय आहे, त्याचे कारण यूरोपीय देशांमध्ये जर्मनीच एकमेव असा देश आहे ज्याने पुढाकार घेऊन शरणार्थींना आश्रय दिला आहे.

पर्सन ऑफ द इयरची सुरुवात केव्हापासून
> 1923 मध्ये टाइम ने 'पर्सन ऑफ द इयर' निवडण्यास सुरुवात केली.
> 1927 पासून नियतकालिकाची छपाई न्यूयॉर्कमधून सुरु झाली.
> 1998 मध्ये प्रथमच या पुरस्कारासाठी ऑनलाइन पोलिंग सुरु केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अँजेला मर्केल यांची टाइमने प्रसिद्ध केलेले फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...