आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Europzone Countries Meeting On Greece Crises

ग्रीस समस्येवर मंगळवारी युरोझोन देशांची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुसेल्स - ग्रीसमध्ये घेतलेल्या आर्थिक शिस्तपालनाविषयीच्या जनमत चाचणीनंतरही अद्याप पेच सुटला नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी युरोपियन देशांची शिखर बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी जर्मनी आणि फ्रान्सने पुढाकार घेतला असल्याचे युरोपीय संघाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले. ग्रीसच्या नागरिकांनी आणीबाणीकालीन कर्ज सहायतेसाठी कर्जदार देशांच्या अटी मान्य नसल्याचा कौल दिला आहे. सरकारी खर्चात कपातींचा प्रस्ताव ग्रीससमोर कर्जदात्या देशांनी ठेवला होता. ग्रीसला आर्थिक आणीबाणीतून काढण्यासाठी कर्जदारांनी आणीबाणी निधी देण्याचे मान्य केले. मात्र या मोबदल्यात ठेवलेल्या शर्थींना ग्रीस नागरिकांनी जनमत कौलाद्वारे स्पष्ट झिडकारल्याने विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.त्यासाठी मंगळवारी संध्याकाळी युरो चलन मान्य केलेल्या देशांची शिखर बैठक असल्याचे टस्क यांनी ट्विटरद्वारे कळविले. युरोझोन देशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक होणार असल्याचे युरो समूहाचे प्रवक्ते मिशेल रिजिन्स यांनी सांगितले. ७ जुलैच्या बैठकीत ग्रीससंबंधी ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.