आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Modi Sharif Meet In Russia, Pakistan Firing At Line Of Control

रशियात पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरीफ भेट; इकडे पाकची खाेडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उफा/श्रीनगर - रशियात गुरुवारी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची डिनरदरम्यान भेट होत असताना पाकिस्तानने मात्र सीमेवर कुरापती काढण्याचा आपला जुनाच डाव पुन्हा खेळला अाहे. पाकिस्तानी फौजांनी गुरुवारी बारामुल्लाजवळ उरी सेक्टरवर गोळीबार केला. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. मोदी-शरीफ यांच्यात शुक्रवारी चर्चा होणार आहे. जेव्हा जेव्हा उभय नेत्यांची भेट झाली तेव्हा तेव्हा पाकने सीमेवर गोळीबार केलेला आहे.
सीमेपलीकडून दुपारी गोळीबाराला सुरुवात झाली. त्यात कॉन्स्टेबल कृष्णकुमार दुबे शहीद झाले. प्रत्युत्तरादखल भारताच्या गोळीबारात पाकचेही काही जवान टिपल्याचे सूत्रांनी सांगितले.