आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today PM Modi Starts Bangladesh Visit, Capital Dhaka Decorated

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा बांगलादेश दौरा आजपासून, राजधानी ढाका सजले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका / नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला बांगलादेश दौरा शनिवारपासून सुरू होणार आहे. त्यांच्यासमवेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील असतील. त्यांच्या स्वागतासाठी ढाका नगरीला उत्सवासारखे सजवण्यात आले आहे.

पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह दोन्ही भारतीय नेत्यांची मोठमोठी कटआऊट्स राजधानीतील प्रमुख मार्गांवर लावलेली दिसतात. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झालेला बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यासाठीचा ‘ स्वातंत्र्य लढा सन्मान पुरस्कार’ मोदी या दौ-यात स्वीकारतील. त्यांचा हा दोनदिवसीय दौरा असेल. भारतासोबत अत्यंत चांगले संबंध राहिलेल्या देशाचा दौरा करण्यासाठी जाताना मला मनापासून आनंद होत आहे. दोन्ही देशांचे संबंध अतिशय मजबूत आहेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवाना होण्यापूर्वी दिली आहे. मोदी यांची बांगलादेशच्या पंतप्रधानांसमवेत द्विपक्षीय चर्चा होईल. बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद अब्दुल हामिद तसेच इतर प्रमुख नेत्यांशीदेखील त्यांची बैठक होणार आहे. मोदी यांच्या दौ-यात तिस्ता जल करारासंबंधी चर्चा होणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ३१ मे रोजी सरकारची भूमिका
मांडली होती की, पश्चिम बंगाल सरकारची सहमती घेण्यात येईल.कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्वराज यांनी सांगितले होते.

दाै-याचा अजेंडा
>कोलकाता-ढाका-आगरतळा, ढाका -शिलाँग-गुवाहाटी बससेवा सुरू होणार.
>रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार. १९६५ पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रेल्वे रूळ दुरुस्त करणार.
>दोन्ही देश सागरी व्यापारासंबंधी करार करतील. भारतीय जहाज बांगलादेशातील बंदरावरून वाहतूक सुरू करतील. सध्या भारतीय जहाजांना सिंगापूरमधून जावे लागते.
>भारतीय कंपन्या बांगलादेशात बंदर बनवण्याची प्रक्रियेत सहभागी होतील.
>बांगलादेश पूर्वोत्तरला दक्षिण-पूर्व आशियाला जोडण्यास मदत करेल, असे भारताला वाटते.